Neem Karoli Baba Web Series: ४०० कोटींची कमाई करणाऱ्या हनुमान अंशच्या यशानंतर आता 'नीम करोली बाबां'वर येणार वेब सिरीज

नीम करोली बाबा यांच्यावर आधारित या चित्रपटाचे हे अनपेक्षित यश पाहून आता त्यांच्यावर वेब सिरीज देखील येत आहे.
Neem Karoli Baba Web Series
Neem Karoli Baba Web Seriespudhari
Published on: 
Updated on: 

Neem Karoli Baba Web Series: भारतीय चित्रपट सृष्टीत २०२६ मध्ये कोणत्या चित्रपटाने धुमाकूळ घातला असेल तर तो चित्रपट आहे 'हनुमान अंश'. अवघ्या २ कोटी रूपयात तयार झालेल्या या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास ४०० कोटींचा गल्ला कमावला आहे. नीम करोली बाबा यांच्यावर आधारित या चित्रपटाचे हे अनपेक्षित यश पाहून आता त्यांच्यावर वेब सिरीज देखील येत आहे. नीम करोली बाबा यांच्यावर सोनी लीव्हवर 'नीम करोली बाबा' ही वेब सिरीज रिलीज केली जाणार असी घोषणा करण्यात आली आहे.

Neem Karoli Baba Web Series
Box Office : ‘हनुमान अंश’ च्या वादळात अक्षय-सैफचा ‘हैवान’ भुईसपाट, महिन्यानंतरही चित्रपटाची घोडदौड सुरूच..

वेब सिरीजची घोषणा

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने ३० सप्टेंबर रोजी नीम करोली बाबा यांच्यावरील वेब सिरीजचा पहिला प्रोमो रिलीज केला आहे. याचे शिर्षक हे नीम करोली बाबा असं ठेवण्यात आलं आहे. ही वेब सिरीज सोनी टीव्ही आणि सोनी लीव्हवर प्रदर्शित होणार आहे.

Neem Karoli Baba Web Series
Marathi New Web series | कामाच्या ठिकाणी प्रेम टिकू शकतं का? ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ घेऊन येतेय नवी प्रेमकहाणी

चमत्कारांबाबत मिळणार माहिती

या वेब सिरीजच्या प्रोमोमध्ये आध्यात्मिक गुरू नीम करोली बाबा यांच्याशी निगडीत गोष्टींचा समावेश आहे. यावरून या वेब सिरीजची स्टोरी ही नीम करोली बाबा यांच्या चमत्कारांबाबत असण्याची शक्यता आहे.

Neem Karoli Baba Web Series
Subodh Bhave |'नीम करोली बाबां'च्या भूमिकेत सुबोध भावे, निर्मात्यांनी बाबांच्या मुलीची घेतली भेट

रिलीज डेट अजून गुलदस्त्यात

या प्रोमोच्या व्हाईस ओव्हरमध्ये, 'ज्या व्यक्तीच्या गोष्टींनी देशाला मंत्रमुग्ध करून टाकलं आहे आता त्यांच्या आयुष्याशी निगडीत चमत्कारिक घटना समोर येणार आहेत.' असा दावा करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये नीम करोली बाबा यांची प्रसिद्ध शॉल आणि भगवान हनुमान यांचा देखीर संदर्भ आला आहे. मात्र प्रोमोमध्ये निर्मात्यांनी याची कास्ट, प्रीमियर डेट किंवा किती एपिसोड असणार हे अजून घोषित केलेलं नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news