Box Office : ‘हनुमान अंश’ च्या वादळात अक्षय-सैफचा ‘हैवान’ भुईसपाट, महिन्यानंतरही चित्रपटाची घोडदौड सुरूच..

नीम करोली बाबांच्या चित्रपटाची २०० कोटींची कमाई
Box Office
Box Office : ‘हनुमान अंश’ च्या वादळात अक्षय-सैफचा ‘हैवान’ भुईसपाट, महिन्यानंतरही घोडदौड सुरूच..file photo
Published on
Updated on

hanuman ansh beats akshay kumar saif ali khan haiwaan box office neem karoli baba

पुढारी ऑनलाईन : बॉक्स ऑफिसवर ‘हैवान’ची संथ सुरुवात झालेली असताना ‘हनुमान अंश’चा दबदबा मात्र कायम आहे. या चित्रपटाने भारतात २०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. दुसरीकडे, अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांचा ‘हैवान’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर संघर्ष करताना दिसत आहे.

Box Office
Child Screen Time : मुलांच्या हातातून मोबाईल खाली ठेवायचांय, मग हे ६ उपाय तुमच्यासाठीच..

अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांचा बहुप्रतीक्षित ‘हैवान’ हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. या क्राइम थ्रिलर चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत. मात्र, चित्रपटाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे दमदार झालेली नाही. दुसरीकडे, ‘हनुमान अंश’चा बॉक्स ऑफिसवरील जलवा अद्याप कायम आहे. प्रदर्शनाला एक महिना उलटून गेल्यानंतरही हा चित्रपट विक्रमी कमाई करत आहे.

‘हैवान’ने पहिल्या दिवशी किती कमाई केली?

‘हैवान’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांना आणि निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, ‘हनुमान अंश’ची जोरदार कमाई आणि ‘मिर्झापूर द मूवी’च्या चर्चेमध्ये हा चित्रपट काहीसा मागे पडल्याचे दिसत आहे.

७ हजारांहून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झालेल्या ‘हैवान’ने पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा कमी कमाई केली. Sacnilkच्या रिपोर्टनुसार, ‘हैवान’ने पहिल्या दिवशी भारतात ३ कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. यासोबतच भारतातील चित्रपटाची एकूण ग्रॉस कमाई ३.६० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

Box Office
Death of Twins : फरशीवर सांडलेले केमिकल जुळ्या भावांनी चाटले अन् होत्याच नव्हत झालं

परदेशात या चित्रपटाने एकूण १ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपटाची एकूण वर्ल्डवाइड ग्रॉस कमाई ४.६० कोटी रुपये झाली आहे.

‘हैवान’च्या निराशाजनक सुरुवातीच्या पार्श्वभूमीवर ‘हनुमान अंश’ने मात्र बॉक्स ऑफिसवरील आपली पकड कायम ठेवली आहे.

‘हनुमान अंश’ने रचला इतिहास

‘हनुमान अंश’चा ३६व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवरील दबदबा कायम आहे. या चित्रपटाने भारतात २०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. Sacnilkनुसार, ‘हनुमान अंश’ने ३६व्या दिवशी १०.५० कोटी रुपयांची नेट कमाई केली.

यानंतर भारतातील चित्रपटाची एकूण ग्रॉस कमाई २०५.१५ कोटी रुपये, तर नेट कमाई १७३.६३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. प्रदर्शनाला एक महिना उलटूनही चित्रपटाची अशी कामगिरी निश्चितच उल्लेखनीय मानली जात आहे.

‘हनुमान अंश’चा जलवा एक महिन्यानंतरही कायम असल्याचे दिसत आहे. चित्रपटाच्या जोरदार कमाईसमोर मोठ्या बजेटचे आणि मोठ्या स्टार्सचे चित्रपटही पिछाडीवर पडताना दिसत आहेत. ‘टॉक्सिक’नंतर आता ‘हैवान’वरही ‘हनुमान अंश’च्या बॉक्स ऑफिसवरील वादळाचा परिणाम होताना दिसत आहे. मात्र, आता वीकेंडला ‘हैवान’च्या कमाईत किती वाढ होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news