Subodh Bhave |'नीम करोली बाबां'च्या भूमिकेत सुबोध भावे, निर्मात्यांनी बाबांच्या मुलीची घेतली भेट

Subodh Bhave | 'नीम करोली बाबां'च्या भूमिकेत सुबोध भावे, निर्मात्यांनी बाबांच्या मुलीची घेतली भेट
Subodh Bhave
Subodh Bhave play role of neem karoli babainstagram
Published on
Updated on
Summary

लोकप्रिय मराठी अभिनेता सुबोध भावे लवकरच ‘नीम करोली बाबा’ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या तयारीसाठी निर्मात्यांनी बाबांच्या मुलीची भेट घेऊन त्यांच्या आयुष्याविषयी आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती घेतली. या भेटीनंतर या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सध्या एका वेगळ्या आणि खास प्रोजेक्टमुळे चर्चेत आला आहे. आध्यात्मिक गुरू ‘नीम करोली बाबा’ यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या चित्रपटात सुबोध भावे बाबांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा रंगली आहे.

अध्यात्मिक गुरू नीम करोली बाबा यांच्या जीवनावरील कहाणी मोठ्या पडद्यावर येणार आहे. दिग्दर्शकांनी नीम करौली बाबा यांची मुलगी गिरीजा यांची भेट घेतली. गिरीजा आता ८० वर्षांच्या आहेत. यावेळी दिग्दर्शक म्हणाले-'मी बाबांच्या कुटुंबीयांकडून हक्क खरेदी केले. मी गिरिजा आणि बाबांच्या संपर्कात आलेल्या अनेक लोकांना भेटलो.

Subodh Bhave
Aneet Padda in Madhubala biopic? - सैयारा फेम अनीत पड्डा मधुबालाच्या बायोपिकमध्ये? नेटिझन्स म्हणाताहेत...

भारतात धार्मिक मान्यतांचे आपले महत्त्व आहे. नीम करोली बाबांचे भक्त देशात आणि जगभरात आहेत. असेदेखील म्हटले जाते की, त्यांच्या भक्तांमध्ये स्टीव जॉब्स आणि मार्क जुकरबर्ग सारखे लोक आहेत. आता नीम करोली बाबा यांच्यावर एक चित्रपट येतोय. विशेष म्हणजे नीम करोली बाबा यांच्या भूमिकेत मराठी अभिनेते सुबोध भावे दिसणार आहे.

Subodh Bhave
Govinda-Sunita Divorce rumors| 'मागील २ वर्षे कठीण काळ..घरात अशांती.. ' गोविंदाच्या मुलीने सांगितले सत्य काय?

निर्माते शरद सिंह ठाकुर नीम करोली बाबा 'श्री बाबा नीब करोरी महाराज' यांच्या जीवनावर चित्रपट बनवत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, नीम करोली बाबा यांच्या परिवाराकडून परवानगी घेण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्याबद्दल देखील खूप संशोधन करण्यात आले. या चित्रपटाचा उद्देश बाबांची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवणे आहे.

मराठी अभिनेता सुबोध भावे साकारणार नीम करोली बाबा यांची भूमिका

जूलिया रॉबर्ट्स, अनुष्का शर्मा, विराट कोहली सारखे सेलिब्रिटीजनी वृंदावन येथील आश्रममध्ये दर्शन घेताना दिसले आहेत. मराठी अभिनेते सुबोध भावे नीम करोली बाबा यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ठाकुर, यांनी कहाणी आणि स्क्रिप्ट देखील लिहिली आहे. त्यांनी सांगितले की, बाबा यांच्या जीवनावर आधारित कथा वेगवेगळ्या भागांमध्ये तयार करण्यात आली आहे.

चित्रपटाचे दोन भाग पूर्ण

दिग्दर्शकाच्या माहितीनुसार, कहाणी तीन भागात तयार करण्यात आला आहे. चित्रपटाचे पहिले दोन भाग तयार करण्या आले आहेत. एकानंतर एक हे भाग रिलीज करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बाबांच्या निधनानंतर ...

ठाकुर यांनी एका बातचीतमध्ये म्हटले आहे - 'आम्ही तिसऱ्या भागाचे शूटिंग सुरू करण्याचे नियोजन करत आहे. ही कहाणी १९७३ मध्ये बाबांच्या निधनापासून सुरू होईल आणि कैंची धाम (नीम करोली बाबा यांच्या आश्रमांपैकी एक)चा विकास कसा झाला, हे दाखवण्यात येईल.'

सुबोध भावेने अनेक हिट मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्याने बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली, आणि..डॉ. काशीनाथ घाणेकर या चित्रपटांमध्ये अभिनय साकारला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news