फाल्गुनी शाह हिला संगीत क्षेत्रातात "फालु' या नावाने ओलखली जाते. फाल्गुनीने आपल्या पुरस्काराची बातमी आपल्या सोशल मीडियावर शेअर करत म्हंटले आहे की, "आज माझ्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत. ग्रॅमी पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे" तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कॉमेंंटचा वर्षाव केला आहे.६४ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात जगभरातील दिग्गज संगीतकार, गायकांनी हजेरी लावली होती. ए. आर. रेहमान यांनीही या पुरस्काराला सोहळ्याला हजेरी लावली होती.