हुपरी: संतसाहित्याचा अभ्यास करुन जीवन सुखकर करावे : ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर

हुपरी: संतसाहित्याचा अभ्यास करुन जीवन सुखकर करावे : ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर

हुपरी; पुढारी वृत्तसेवा : समृद्ध जीवनासाठी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर यांच्या अभंग ओव्यांचा अभ्यास करून त्यामधील विचार अंगीकारले पाहिजेत. युवा पिढीने व्यसनांच्या आहारी न जाता छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन धर्म संस्कृती टिकविण्यासाठी काम करावे. कोरोना महामारी हा परमेश्वराने मानवजातीला दाखविलेला डेमो असून, आता तरी सुधारणा होणे गरजेचे आहे असे सांगताना त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या "आता तरी पुढे हाचि उपदेश। नका करु नाश आयुष्याचा ॥
या अभंगाच्या माध्यमातून किर्तनातून ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यानी येथे प्रबोधन केले.

पैसाफंड शेतकी सहकारी बँकेचे संचालक विलासराव नाईक यांच्या पत्नी व उद्योजक विवेक व रवि नाईक यांच्या मातोश्री स्व. विद्याताई विलासराव नाईक यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्य राष्ट्रीय युवा किर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांच्या किर्तनाचे आयोजन केले होते. श्री अंबाबाई मंदिर येथील मंचावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमास हजारो नागरीक बंधू, भगिनी व युवा भाविक भक्तांनी हजेरी लावली होती.प्रारंभी ह.भ.प. चैतन्य महाराज यांचे हस्ते स्व. विद्याताई विलासराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करणेत आले. त्यानंतर पैसाफंड बँकेचे संचालक विलासराव नाईक व चांदी कारखानदार असोशिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक यांचे हस्ते चैतन्य महाराज यांचा सत्कार करण्‍यात आला.

पैसाफंड बँकेचे कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी प्रास्ताविक केले. हुपरी परिसर वारकरी सांप्रदायाचे सदस्यांनी किर्तन सोहळ्यास टाळकरी साथ दिली. या कार्यक्रमास अंबाबाई भक्त मंडळाचे सदस्य, पैसाफंड बँकेचे सर्व संचालक, चांदी कारखानदार असो.चे सर्व संचालक, संत बाळूमामा पायी दिंडी, श्री गोपाळकृष्ण स्वामी महाराज पायी दिंडी,तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका , मान्यवर तसेच नागरीक उपस्थित होते. सूत्रसंचालन पूजा रेंदाळे यांनी तर आभार अमर कुलकर्णी , रवि नाईक यांनी मानले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news