How Genelia Deshmukh learned Marathi | लग्नानंतर सासरच्या घरासाठी शिकली मराठी; जेनेलिया इतकं शुद्ध कसं बोलते? ‘हे’ आहे तिचे सीक्रेट!

How Genelia Deshmukh learned Marathi | लग्नानंतर सासरच्या घरासाठी शिकली मराठी; Genelia Deshmukh इतकं शुद्ध कसं बोलते? ‘हे’ आहे तिचे सीक्रेट!
Genelia Deshmukh
Genelia Deshmukh learned MarathiInstagram
Published on
Updated on
Summary

Genelia Deshmukh हिने ‘Ved’ या चित्रपटातून तिच्या अस्खलित मराठीने प्रेक्षकांना प्रभावित केलं. मूळची मराठी नसतानाही लग्नानंतर Riteish Deshmukh च्या कुटुंबात राहताना तिने दैनंदिन संभाषण, सराव आणि मेहनतीच्या जोरावर मराठी भाषा आत्मसात केली.

Genelia Deshmukh Marathi language

जेनेलिया दे हिने मराठी भाषेवर मिळवलेलं प्रभुत्व सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मूळची मराठी नसतानाही ती इतकी सहज आणि स्पष्ट मराठी बोलते, याचं कौतुक सर्वत्र होत आहे. वेड चित्रपटात तिला आपण मराठी बोलताना पाहिलं आहे. अगदी सहज ती मराठी बोलताना दिसली. वेड या चित्रपटात तिच्या डायलॉगने प्रेक्षकांना विशेष भुरळ घातली. तिच स्पष्ट उच्चार, अचूकता आणि हावभाव, नैसर्गिक अभिनयामुळे ती “खऱ्या मराठी अभिनेत्री”सारखी वाटली.

दुसरीक़डे आता राजा शिवाजी हा चित्रपट रिलीज झाला आहे. यामध्ये अभिनेता, तिचा पती रितेश देशमुख आणि तिची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटातील तिचे उत्तम मराठी डायलॉग्ज प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. प्रेक्षकांना डोळ्यांतून अश्रू आणण्यास भाग पाडणारे दृश्ये आणि उत्तम संवाद, उत्कृष्ट सहज सुंदर साकारलेला अभिनय सगळेच महत्वाचे ठरले आहे.

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टी गाजवलेली अभिनेत्री जेनेलिया देशमुखने आज मराठी चित्रपटांतून खऱ्या अर्थाने स्वत:ला सिद्ध केलं आहे. मग चित्रपटातील अभिनय असो वा अनेक पुरस्कार सोहळे वा मुलाखती..प्रत्येक ठिकाणी ती मराठीमध्ये बोलते हे वाखाणण्याजोगे आहे. सोशल मीडियावर असो वा एखाद्या कार्यक्रमात, जेनेलिया ज्या पद्धतीने लाडिक आणि अस्खलित मराठी बोलते, त्याचं सर्वांनाच कौतुक वाटतं. पण मुळात मुंबईत वाढलेल्या आणि अमराठी भाषिक पार्श्वभूमी असलेल्या जेनेलियाने इतकं छान मराठी कसं आत्मसात केलं? असा प्रश्न अनेकांना पडतो.

रितेश ठरला खऱ्या अर्थाने 'गुरु'

जेनेलियाच्या मराठी बोलण्यामागे सर्वात मोठा हात तिचा पती, अभिनेता रितेश देशमुखचा आहे. एका मराठी कुटुंबात लग्न केल्यानंतर जेनेलियाला घरातल्या मासांचा सहवास लाभलाच शिवाय तिने स्वत: ही भाषा शिकण्यास सुरुवात केली. अगदी घरात मुलांना मम्मी-पप्पा नव्हे तर आई-बाबा म्हणण्यास शिकवले. रितेशने तिला केवळ शब्दच शिकवले नाहीत, तर भाषेतील हेल आणि उच्चार स्पष्ट होण्यासाठीही मोठी मदत केल्याचे म्हटले जाते. अनेक मुलाखतींमध्ये जेनेलियाने स्वतः कबूल केलं की, रितेशने तिचा आत्मविश्वास वाढवला.

Genelia Deshmukh
Genelia Deshmukh - 'राजा शिवाजी' चित्रपट रिलीज होताच जेनेलियाचं फोटोशूट, जामदानी पैठणीत सजली 'राणी'

एका मुलाखतीत रितेश-जेनेलिया आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलत होते. त्यावळी रितेशने आपल्या कॉलेज लाईफ क्रशबद्दल सांगितलं होतं. तो मराठीमध्ये म्हणाला होता की- कॉलेजमध्ये मला एक मुलगी आवडायची. मी तिला कधी बोललो नाही...यावर लगेच जेनेलिया म्हणते.. 'बरं झालं...' हे उद्गार काढताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. सांगायचा उद्देश असा की, ती उत्तमपणे मराठी समजेत आणि खूप छान पद्धतीने बोलते देखील.

video- dreamsinedits insta वरून साभार

देशमुख कुटुंबाचा वारसा आणि पाठिंबा

लातूरच्या देशमुख कुटुंबात मराठी संस्कृती जपली जातेच. शिवाय सून जेनेलियाला एकमेकांशी बोलताना या भाषेचा गोडवा आणि बारकावे देखील समजले. घरामध्ये होणाऱ्या चर्चां आणि संवादातून ती हळूहळू या भाषेशी एकरूप झाली.

Genelia Deshmukh
Raja Shivaji Anthem Song: अंगावर काटा येणार! ‘राजा शिवाजी’चं अँथम रिलीज; अजय-अतुलने पुन्हा धुमाकूळ घातला

मुलांमुळे भाषेवर अधिक पकड

रितेश आणि जेनेलिया आपल्या मुलांशी (रियान आणि राहिल) नेहमी मराठीत बोलण्यावर भर देतात. मुलांना आपली संस्कृती कळावी, या उद्देशाने घरात होणाऱ्या या वापरामुळे जेनेलियाचा सराव रोजच्या रोज होतो. दिवाळीचा सण, गणपती उत्सव सर्वच सणं-उत्सवात तितक्याच आनंदाने ती सहभागी होते. "मुलांशी बोलताना मी अधिक चांगल्या प्रकारे शिकले," असे ती आवर्जून सांगते.

मराठी भाषेबद्दलची ओढ

केवळ सासरची भाषा म्हणून नाही, तर महाराष्ट्राच्या मातीशी आणि संस्कृतीशी जेनेलियाचे एक अतूट नाते निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news