पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एकामागून एक सेलिब्रिटी लग्नाच्या बंधनात अडकत आहेत. यापूर्वी अभिनेत्री कॅटरिना कैफ, विक्की कौशल, फरहान अख्तर, शिबानी दांडेकर, लव रंजन यांच्यासह अनेक स्टार्स विवाहबंध झाले आहेत. तर या यादीत आणखी एका स्टारचे नाव जोडले जाणार आहे. प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल ( jubin nautiyal ) आणि अभिनेत्री निकिता दत्ता त्यांच्या रिलेशलशिपमुळे चर्चेत आहेत. जुबिन आणि निकिता दोघेजण गुपचूप लग्नाची तयारीत असल्याची माहिती सोशल मीडियावर मिळत आहे.
अलीकडेच निकिताने जुबिन नौटियालसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत दोघेही आनंदीत दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'मी माझ्यातील थोडा आत्मा डोंगरात सोडला आहे.' या पोस्टला रिप्लाय देताना जुबिन नौटियालने लिहिले आहे की, 'तुम्ही इथेही तुमचे हृदय विसरलात का?' असे लिहिले होते. यानंतर दोघांच्यातील अफेअरच्या चर्चांना उधान आलं.
एका रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, जुबिन आणि निकिता दोघांचे कुटुंबीय एकमेकांना भेटले असल्याची चर्चा आहे. निकिता उत्तराखंडमध्ये जुबिन नौटियाल याच्या घरी गेली होती. तर लग्नाच्या प्लॅनिंग आणि भेटण्यासाठी जुबिन मुंबईतही आला असल्याचे वृत्त समोर आले आहे. याशिवाय दोघंही अनेक वेळा रेस्टॉरंटच्या बाहेर एकत्रित स्पॉट झाले आहेत. निकिता एकदा जुबिनला घेण्यासाठी विमानतळावर पोहोचली होती. यामुळे दोघांच्यात अफेअर असून लवकरच लग्न करणार असल्याचा कयास चाहत्यांनी लावला आहे. परंतु, याबाबतची अधिकृत माहिती अध्याप मिळालेली नाही.
जुबिन ( jubin nautiyal ) आणि निकिता यांची पहिली भेट 'कबीर सिंह' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. निकिताने या चित्रपटात शाहिद कपूरच्या मैत्रिणीची भूमिका केली होती. या चित्रपटातील 'तुझे कितना चाहें' हे गाणे झुबिनने गायिले आहे. झुबिन आणि निकिता अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर कॉमेंन्टस करत असतात.
जुबिन नौटियाल यांचा जन्म १४ जून १९८९ रोजी डेहराडून, (उत्तराखंड) येथे झाला. जुबिन नौटियाल यांनी बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध गाण्यांना आपला आवाज दिला आहे. 'इश्क दा मारा', 'बंदेया, समंदर', 'काबिल हूं मैं', 'बूंद-बूंद', 'आवारगी', 'फिर मुलाकात', 'बारिश', 'दिल जाने', 'तारों के शहर', 'राता लंबियां', 'कमली' आणि 'आंख उठती मोहब्बत' यासारखी प्रसिद्ध गाणी त्यांनी गायिली आहेत.
निकिता दत्ता एक टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री आहे. तिने 'ड्रिम गर्ल', 'एक दूजे के वास्ते' आणि 'हासिल और आफत' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. टीव्हीशिवाय निकिता 'गोल्ड', 'लस्ट स्टोरीज', 'कबीर सिंह', 'द बिग बुल' या चित्रपटांमध्ये दिसली आहे. याशिवाय निकिता २०१२ मध्ये 'फेमिना मिस इंडिया'ची फायनलिस्ट राहिली आहे. निकिता दत्ताने 'लेकर हम दीवाना दिल' चित्रपटांतून पहिल्यांदा पदार्पण केले.
हेही वाचलंत का?