ekta kapoor
ekta kapoor

Ekta Kapoor : बिग बॉस १६ मध्ये ‘एन्ट्री’ करणार एकता कपूर, ‘लव्‍ह, सेक्स और धोखा 2’ची घोषणा करणार

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टेलिव्हिजन क्वीन एकता कपूर (Ekta Kapoor) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'लव्‍ह, सेक्स और धोखा' आणल्यानंतर आता एकता कपूर बिग बॉसमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये ती लव्‍ह, सेक्स और धोखा चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा करणार असल्याची माहिती समजतेय. (Ekta Kapoor)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकता कपूर बिग बॉसच्या आगामी एपिसोडमध्ये दिसेल. दिबाकर बॅनर्जी बालाजी टेलिफिल्म्सचा पुढील चित्रपट 'लव सेक्स और धोखा २' ची घोषणा करण्यासाठी बिग बॉस १६ मध्ये एन्ट्री करणार आहे. हे प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज असणार आहे.

बिग बॉस १६ ची लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी सिक्वलची घोषणा करण्याचा निर्णय या सोच्या माध्यमातून घेतल्याचे समजते. एकता कपूरचे शो, मालिका आणि चित्रपट नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे या सीक्वलची चर्चा होणे साहजिक आहे. लव्‍ह, सेक्स और धोखा २०१० मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात राजकुमार राव, नुसरत भरूचा या कलाकारांच्या भूमिका होत्या. २ कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने ९.८ कोटींचा  बिझनेस केला होता.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news