Gautami Patil : गौतमीचा बोलबाला! आता वेब सीरीजमध्ये झळकणार | पुढारी

Gautami Patil : गौतमीचा बोलबाला! आता वेब सीरीजमध्ये झळकणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या गौतमीचा बोलबाला सगळीकडे सुरु आहे. (Gautami Patil ) आता डान्सर गौतमी पाटील गाणी आणि चित्रपटांसोबत वेब सीरीजमध्येही झळकणार आहे. आपल्या डान्सने तिने सर्वांनाच भूरळ पाडले आहे. आता ती वेबसीरीजमध्येही दिसणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना आता उत्सुकता लागून राहिली आहे. वेब सीरीजमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती तिने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. (Gautami Patil )

गौतमी डान्समुळेचं नाही सोशल मीडिया स्टार बनलीय. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे अनेक डान्सचे व्हिडिओ पाहायला मिळताहेत. दरम्यान, तिच्या हावभावांवरून तिला ट्रोल गेले. अनेक लावणी नृत्यांगनांनी तिच्यावर टिका केली. गौतमी ही मुळची धुळ्याची आहे. तिचे शिक्षण कमी झाले आहे. डान्स शिकण्यासाठी ती पुण्यात आली, अशी माहिती तिने एका मुलाखतीत स्वत: दिली होती.

सौंदर्यासोबतचं डान्सने तिने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. तिचा डान्स पाहण्यासाठी अलोट गर्दी होते. शहरातचं नव्हे तर गावागावामध्येही गौतमीने आपला जलवा दाखवला आहे. दोन गाणी आणि चित्रपटदेखील तिच्या झोळीत आहे. आता वेब सीरीजमध्ये दिसणार म्हटल्यावर तिचे फॅन्स अधिक उत्सुक ठरले आहेत. पण वेब सीरीज अथवा चित्रपटाचे नाव तिने सांगितलेले नाही.

 

Back to top button