Eetha Teaser: नऊवारी साडी, केसात गजरा, कपाळावर मोठी टिकली; श्रद्धा कपूरचा धमाका, प्रेक्षकांनी लावला डोक्याला हात

Eetha Teaser: श्रद्धा कपूरच्या आगामी ‘ईठा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Eetha Teaser
Eetha TeaserPudhari
Published on
Updated on

Eetha Teaser: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर पुन्हा एकदा एका वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या आगामी ‘ईठा ’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून त्यातील तिचा जबरदस्त अभिनय आणि मराठमोळा अंदाज सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

‘कॉकटेल 2’ चित्रपटाच्या प्रदर्शनासोबतच ‘ईथा’चा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला. अवघ्या काही सेकंदांच्या या टीझरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता कमालीची वाढली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात श्रद्धा कपूर महाराष्ट्रातील दिग्गज तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

टीझरची सुरुवात अतिशय भावनिक आणि धक्कादायक दृश्याने होते. गर्भवती असलेली श्रद्धा वेदनेने तडफडताना दिसते. तमाशाच्या फडावर सुरू असलेल्या कार्यक्रमादरम्यान ती प्रसूती वेदना सहन करत असतानाही मंच सोडत नाही. या प्रसंगातून तिच्या व्यक्तिरेखेची जिद्द आणि कलेप्रती असलेलं समर्पण अधोरेखित होतं.

यानंतर घुंगरांच्या आवाजासह श्रद्धाचा दमदार आवाज ऐकू येतो. 'पड़े-पड़े मरी तो बेचारी कहलाऊंगी... पर नाचते हुए मरी, तो मिसाल बन जाऊंगी,'. नऊवारी साडी, केसात गजरा, कपाळावर मोठी टिकली आणि पारंपरिक मराठी तमाशा कलाकाराचा वेश अशा रूपात श्रद्धा कपूर पूर्णपणे विठाबाईंच्या भूमिकेत रंगून गेल्याचे दिसते. तिच्या चेहऱ्यावरचे भाव, आक्रमक लावणी आणि अभिनयातील तीव्रता यामुळे हा तिच्या कारकिर्दीतील सर्वात वेगळा आणि दमदार रोल मानला जात आहे.

Eetha Teaser
Telegram Ban: टेलिग्रामला मोठा झटका; 22 जूनपर्यंत बंदी कायम, हायकोर्टाने याचिका फेटाळली

या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘छावा’ फेम लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. चित्रपटात श्रद्धासोबत रणदीप हुड्डा आणि मोहम्मद झीशान अय्यूब यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.

सोशल मीडियावर टीझरला मिळणारा प्रतिसाद पाहता ‘ईठा ’ हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहणार नाही, तर एका महान कलावंताच्या संघर्षाची आणि कलेवरील निष्ठेची कहाणी मोठ्या पडद्यावर येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईठा हा चित्रपट 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. श्रद्धा कपूरच्या या नव्या अवताराने चाहत्यांची उत्सुकता मात्र आत्तापासूनच शिगेला पोहोचली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news