‘ज्ञानेश्वर माऊली’ मालिकेने गाठला ५०० भागांचा टप्पा!

ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानेश्वर माऊली
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी मराठी वाहिनीवरील 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेने संतांची परंपरा उलगडत प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे. माऊली आणि त्यांची भावंडं, यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलं. प्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेत. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळते आहे. आळंदीच्या ग्रामस्थांना माउलींच्या दिव्यत्वाचे दर्शन वेळोवेळी होते आहे. माऊली आणि त्यांची भावंड यांचे चमत्कार ग्रामस्थांना पाहायला मिळाले.

मालिकेत माऊली आणि त्यांची भावंडं यांच्याबरोबर संत सेना महाराज यांची भेट झाली. आत्तापर्यंत निरनिराळे संत आणि त्यांची मांदियाळी आपल्याला 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेतून पाहायला मिळालीय. ही मालिका आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलीय. मालिकेचे ५०० भाग पूर्ण होताहेत. माऊलींचे चमत्कार आपल्याला यापुढेही पाहायला मिळतील. आता माऊलींच्या कार्यात ग्रामजोशी पुन्हा अडथळा निर्माण करताना दिसणार आहेत. त्यांना माऊली आणि त्यांची भावंडं कसे सामोरे जाणार, हे पाहायला मिळणार आहे.

'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले. येत्या रविवारी ९ एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वा. मालिकेचा महाएपिसोड सोनी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news