सिंहगड एक्स्प्रेसमध्ये संतापजनक प्रकार, लपूनछपून महिलांचे व्हिडिओ शूटिंग, आरोपीला प्रवाशांनी दिला चोप

सिंहगड एक्स्प्रेसमध्ये संतापजनक प्रकार, लपूनछपून महिलांचे व्हिडिओ शूटिंग, आरोपीला प्रवाशांनी दिला चोप

पुढारी ऑनलाईन: पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसमध्ये गेल्या दोन दिवसांपासून एक संतापजनक प्रकार सुरू आहे. या गाडीमध्ये एक विकृत प्रवासी लपूनछपून महिला प्रवाशांचे व्हिडीओ काढत होता. त्या व्यक्तीला आज प्रवाशांनी रंगेहाथ पकडलं आहे. सिंहगड एक्स्प्रेसम कल्याण रेल्वे स्थानकामध्ये पोहोचल्यावर प्रवाशांनी या विकृत व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. आरोपी हा मदरशामधील शिक्षक आहे. लोहमार्ग पोलिसांनी त्याच्यावर विनयभंगासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

मोहम्मद अश्रफ असे व्हिडीओ काढणाऱ्या प्रवाशाचे नाव आहे. सिंहगड एक्स्प्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून हा व्यक्ती असे प्रकार करत होता. आज व्हिडिओ काढताना त्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर गाडीतील प्रवाशांनी त्याला चोप दिला.

हा प्रकार धावत्या ट्रेनमध्ये समोर आला आहे. त्यानंतर प्रवाशांनी लगेच ही बाब टीसीच्या लक्षात आणून दिली. टीसीने लागलीच कल्याण पोलिसांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तोपर्यंत प्रवाशांनी आरोपीला पकडून ठेवले होते. कल्याण स्थानकावर गाडी येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याबाबत कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी प्रवाशांनी केली आहे. हा सर्व प्रकार कर्जत हद्दीत घडल्याने हा गुन्हा व आरोपी कर्जत रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासून हा व्यक्ती या गाडीने ये-जा करत सहप्रवासी महिलांचे व्हिडिओ तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news