भोर : पीएमआरडीए घरकुलांचे प्रलंबित अनुदान जमा होणार : आमदार थोपटे | पुढारी

भोर : पीएमआरडीए घरकुलांचे प्रलंबित अनुदान जमा होणार : आमदार थोपटे

भोर; पुढारी वृत्तसेवा : पीएमआरडीएमधील लाभार्थ्यांना घरकुलांचे प्रलंबित अनुदान तात्काळ जमा होणार असल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली. भोर विधानसभा मतदारसंघातील पीएमआरडीए संचलित घरकुल योजनेंतर्गत दोन महिन्यांपासुन अनुदान जमा न झाल्याने लाभार्थी हवालदिल झाले होते. याकरिता आमदार संग्राम थोपटे यांनी आयुक्त राहुल महिवाल यांची भेट घेतली होती. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहआयुक्त स्नेहल बर्गे यांना प्रलंबित अनुदान तत्काळ जमा करण्याच्या सूचना केल्या.

संबंधित एजन्सीद्वारे उर्वरित घरांचे सर्वेक्षण करून अनुदान मागणी करणार असल्याचे सांगितले. नसरापूर येथील मुख्य रस्ता 10 मीटर रुंद करण्याबाबत पीएमआरडीए व सार्वजनिक बांधकाम विभाग यांची संयुक्त बैठक घेण्याबाबत चर्चा झाली. इतर रस्ते मंजूर करण्याचीही मागणी आमदार थोपटे यांनी केली.

या वेळी भोर पंचायत समिती माजी उपसभापती रोहन बाठे, मुळशी तालुका काँग्रेस अध्यक्ष गंगाराम मातेरे, मुळशी बाजार समिती संचालक दादाराम मांडेकर, राहुल शेडगे, अंकुश खाटपे, भूगावच्या सरपंच अर्चना सुर्वे, निकिता सणस यांच्यासह सचिन आंग्रे आदी उपस्थित होते.

Back to top button