‘प्रोजेक्ट के’ मध्ये दिशा पाटनी

disha patani
disha patani

पुढारी ऑनलाईन डेस्क

आजपर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट असल्याचा दावा ज्याबाबत केला जातो त्या 'प्रोजेक्ट के' मध्ये आता दिशा पाटनीचीही एन्ट्री झाली आहे. दिग्दर्शक नाग अश्‍विन यांच्या या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण अशी तगडी स्टारकास्ट आहे. त्यामध्येच आता दिशाचीही वर्णी लागली आहे. हा एक विज्ञानावर आधारित चित्रपट आहे. त्याचे शूटिंग हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीतील एका विशाल सेटवर होईल. तो तेलगू, तामिळ, कन्‍नड आणि मल्याळम तसेच हिंदी भाषेत प्रदर्शित केला जाईल. दिशा लवकरच 'एक व्हिलन-2'मध्ये दिसून येणार आहे. त्यामध्ये तिच्यासमवेत अर्जुन कपूर, जॉन अब—ाहम आणि तारा सुतारिया हे कलाकार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news