नाशिक : लालपरीची वारी; धार्मिक स्थळांच्या दारी

धार्मिक स्थळे www.pudhari.news
धार्मिक स्थळे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : साडेपाच महिन्यांच्या कर्मचारी संपानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हळूहळू सावरत आहे. उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने दैनंदिन फेर्‍यांमध्ये वाढ केली आहे. तसेच पर्यायी मार्गांवर उत्पन्नवाढीसाठी धार्मिक स्थळांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे लालपरीची वारी आता धार्मिक स्थळांच्या दारी पोहोचत आहे.

'प्रवाशांच्या सेवेसाठी' असे ब्रीद वाक्य मिरविणार्‍या एसटी महामंडळाला कोरोनाचा मोठा फटका सहन करावा लागला होता. आता राज्य निर्बंधमुक्त झाल्याने तसेच कर्मचारी संप मिटल्याने एसटी प्रशासनाकडून उत्पन्नवाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेे. त्या अंतर्गतच नाशिक विभागाकडून देवस्थानांच्या ठिकाणी अर्थात धार्मिक पर्यटनाला प्राधान्य दिले आहे. संपापूर्वी सुरू असलेल्या धार्मिक स्थळांसाठीच्या बसेस टप्प्याटप्प्याने पुन्हा सोडण्याचे नियोजन केले जात आहे. नाशिक विभागातून त्र्यंबकेश्वरहून शेगावसाठी शिवशाही बस धावत आहे. तर नाशिक-पंढरपूर या मार्गावर विठाई बस वेळेनुसार सोडण्यात येत आहे. तसेच नाशिक-कोल्हापूर, नाशिक-शनिशिंगणापूर आणि नाशिक-गोंदवले या मार्गावर साध्या बसेस मार्गस्थ होत आहेत. दरम्यान, पुढील टप्प्यात अष्टविनायक दर्शन बस नियमित करण्याचे नियोजन आहे. भाविकांची अर्थात प्रवाशांच्या मागणीनुसार बससेवेत आवश्यक बदल तसेच फेर्‍या वाढविण्याचा निर्णय घेतला जाईल, असे एसटी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

धार्मिक स्थळी धावणार्‍या बसेस : त्र्यंबकेश्वर-शेगाव (शिवशाही), नाशिक-पंढरपूर (विठाई), नाशिक-शेगाव, नाशिक-कोल्हापूर, नाशिक-गोंदवले, नाशिक-शनिशिंगणापूर.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news