अल्पवयीन मुलावर अत्याचार करुन खून केल्याप्रकरणी जन्मठेप, नेमकं प्रकरण काय?

अल्पवयीन मुलावर अत्याचार करुन खून केल्याप्रकरणी जन्मठेप, नेमकं प्रकरण काय?

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्यानंतर खून केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने मरेपर्यंत दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डांभुर्णी गावात एका विवाहानिमित्त आरोपी यश ऊर्फ गोलू चंद्रकांत पाटील हा भोकर या गावी आलेला होता. तेव्हा त्याची गावातील 11 वर्षीय अल्पवयीन मुलाशी ओळख होऊन त्याला तो गावातील शेतात नैसर्गिक विधीसाठी जायचे म्हणून घेऊन गेला. त्या ठिकाणी त्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्या मुलाचा खून केला होता. मुलगा घरी आला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी तालुका पोलिस स्टेशनला त्यांच्या मुलाचे अपहरण केल्याबाबतची फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून तपास सुरू असताना मुलाचे प्रेत आढळल्यामुळे त्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून खून केला असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच दिवशी आरोपी यश ऊर्फ गोलू चंद्रकांत पाटील याला पोलिसांनी अटक केली होती. तपासी अंमलदार पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी गुन्ह्याचा तपास करून सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध होण्यासाठी जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. ठुबे यांच्याकडे एकूण 12 साक्षीदार तपासले. त्यात गावातील त्या दिवशी बर्फाचा गोळा विकणारा अनिल भोई, डॉ. नीलेश देवराज, लक्ष्मण सातपुते – नायब तहसीलदार व इतर पंच यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सर्व पुराव्यांवरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. ठुबे यांनी आरोपीला दोषी ठरवून यश ऊर्फ गोलू चंद्रकांत पाटील याला अल्पवयीन पीडित मुलगा याच्यावरील अनैसर्गिक अत्याचार करून खून केल्या प्रकरणी मरेपर्यंतची शिक्षा दंडासह सुनावली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news