

Dhurandhar Review Ranveer Sing Audience Reaction: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपटात रणवीर सिंहने मोठ्या पडद्यावर जोरदार कमबॅक केलं आहे. रिलीजपूर्वी ट्रेलरची खूप चर्चा झाली होती. आज हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होताच या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. भारतीय सिनेमातील सर्वात हिंसक आणि तगडी अॅक्शन फिल्म म्हणून ‘धुरंधर’ला ओळख मिळाली आहे. रणवीरच्या हॉलिवूड-लेवल सीन्ससाठी प्रचंड कौतुक होत आहे.
पहिला शो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपले रिव्ह्यू शेअर करायला सुरुवात केली आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद सकारात्मक आहे. रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या अभिनयाची प्रशंसा होत आहे.
एका एक्स यूजरने लिहिले, “धुरंधर पावरहाऊस आहे! 4/5. पहिल्याच फ्रेमपासून जबरदस्त सिन. रणवीर सिंह मेजर मोहितच्या भूमिकेत कधी नव्हे इतका इंटेन्स दिसतो”
संजय दत्तची एंट्री पाहून तर चाहत्यांनी थिएटरमध्ये अक्षरशः शिट्ट्यांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी त्याच्या स्क्रीन प्रेझेन्सला “धमाकेदार”, “पॉवरफुल” म्हटले आहे.
दुसऱ्या एका यूजरने लिहिले “धुरंधर खरोखरच धमाकेदार आहे! पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना पकडून ठेवतो. अभिनय, कथा, दिग्दर्शन—सगळं परफेक्ट.”
ऑस्ट्रेलियामध्ये पहिला शो पाहणाऱ्या एका प्रेक्षकाने प्रतिक्रिया दिली की, “थ्री-व्हर्ड रिव्ह्यू: शक्तिशाली. अॅक्शनने भरलेला. धुरंधर हा अॅक्शन ड्रामा आहे”
अनेकांनी म्हटलं की, “अॅक्शनची स्केल, योग्य पद्धतीने सांगितलेली कथा, फिल्मला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. युद्ध आणि रेस्क्यू सीन्स थरारक आहेत.”
देशभक्तीची थीम असूनही चित्रपट कुठेही ओढूनताणून दाखवला नाही असे प्रेक्षकांचे मत आहे. उलट कथेमधील प्रेझेंटेशन त्यांना सतत गुंतवून ठेवतं, असा त्यांचा अनुभव आहे. 3 तास 34 मिनिटांचा रनिंग टाइम आणि एक पोस्ट-क्रेडिट सीन असल्याने याला “पूर्ण थिएट्रिकल अनुभव” असेही म्हटले जात आहे.
आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंहसोबत संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.