120 Bahadur Box Office: फरहान अख्तरचा हिस्टोरिकल वॉर चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित; पहिल्या दिवशी किती कमाई केली?

120 Bahadur Box Office Collection Day 1: ‘120 बहादुर’ने पहिल्या दिवशी सुमारे 2.35 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचे अंदाजित बजेट आहे 80 कोटी, त्यामुळे सुरुवात अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे.
120 Bahadur Box Office Collection Day 1
120 Bahadur Box Office Collection Day 1Pudhari
Published on
Updated on

120 Bahadur Box Office Collection Day 1: बॉक्स ऑफिसवर या आठवड्यात काही नव्या चित्रपटांची एन्ट्री झाली असून त्यामध्ये सर्वाधिक चर्चा होत आहे ती फरहान अख्तर यांच्या हिस्टोरिकल वॉर फिल्म ‘120 बहादुर’ची. याच दिवशी कॉमेडी एंटरटेनर ‘मस्ती 4’ चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. मात्र मोठी आणि दमदार कमाई करणारी कोणतीही फिल्म सध्या थिएटर्समध्ये नसल्याने ‘120 बहादुर’ला प्रेक्षकांना आकर्षित करण्याची मोठी संधी आहे.

देशाला अभिमान वाटेल अशी कथा सांगणारा हा चित्रपट बिग बजेटमध्ये बनवला आहे. त्यामुळे निर्मात्यांसाठी पहिला आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे. आगामी दिवसांत काही मोठ्या फिल्म्स रिलीज होणार असल्याने पहिले दोन विकेन्डच या चित्रपटाचे भविष्य ठरवणार आहेत.

ओपनिंग डेची कमाई

रिलीजपूर्वी झालेल्या पेड प्रीमियरमधून सुमारे 10 लाखांची कमाई झाली आहे. त्यानंतर चित्रपटाने ओपनिंग डेवर भारतात 2.35 कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे पहिल्या दिवसापर्यंतचे एकूण कलेक्शन 2.45 कोटींच्या आसपास पोहोचले आहे.

120 Bahadur Box Office Collection Day 1
IND vs SA 2nd Test Day 1: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, दक्षिण आफ्रिकेने ६ गडी गमावत केल्‍या २४७ धावा

रिपोर्ट्सनुसार चित्रपटाचे बजेट साधारण 80 कोटी इतके आहे. त्यामुळे पहिल्या दिवसाची कामगिरी किंचित निराशाजनक म्हणावी लागेल. आता विकेन्डला कलेक्शनमध्ये वाढ होणे, हे चित्रपटासाठी आवश्यक आहे.

1962 च्या रेजांगला युद्धाची कहाणी

‘120 बहादुर’ची कथा 1962 मधील रेजांगला युद्धावर आधारित आहे. या ऐतिहासिक युद्धात भारतीय जवानांनी दाखवलेल्या पराक्रमाचे चित्रपटात प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. फरहान अख्तर मेजर शैतान सिंह यांची भूमिका साकारत आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केले असून, लीड अभिनेत्री म्हणून राशी खन्नाला संधी मिळाली आहे.

120 Bahadur Box Office Collection Day 1
Pune Medical Bio Waste: पुण्यात मेडिकल बायोवेस्टचा मोठा घोटाळा! शहरात रोज 9 टन कचरा, अनेक दवाखान्यांची नोंदच नाही

पहिल्या दिवसाची गती संथ असली तरी हिस्टोरिकल वॉर हा विषय आणि दमदार स्टारकास्टमुळे चित्रपटाला अजूनही चांगली संधी आहे. आता प्रेक्षकांचा पाठिंबा आणि विकेन्डची कमाई ‘120 बहादुर’चे यश ठरवणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news