Dhurandhar : मेजर मोहित शर्मा कोण होते? त्यांच्या कुटुंबीयांचा 'धुरंधर' चित्रपटावर आक्षेप का आहे?

रणवीर सिंहचा 'धुरंधर' हा बॉलिवूड चित्रपट कायदेशीर अडचणीत सापडला आहे. मेजर मोहित शर्मा कोण होते, त्यांना शौर्य पुरस्कार कशासाठी मिळाला आणि त्यांच्या कुटुंबाचा धुरंधर चित्रपटावर काय आक्षेप आहे? वाचा सविस्तर...
Dhurandhar
Dhurandharfile photo
Published on
Updated on

Dhurandhar

दिल्ली: रणवीर सिंहचा 'धुरंधर' हा बॉलिवूड चित्रपट कायदेशीर अडचणीत सापडला आहे. या चित्रपटातील रणवीरनेचे पात्र उच्च लष्करी अधिकारी मेजर मोहित शर्मा यांच्या जीवनावर आधारित असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. चित्रपटासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याचा आक्षेप घेत, कुटुंबीयांनी थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जाणून घेऊया मेजर मोहित शर्मा कोण होते, त्यांना शौर्य पुरस्कार कशासाठी मिळाला आणि त्यांच्या कुटुंबाचा धुरंधर चित्रपटावर काय आक्षेप आहे?

कोण होते मेजर मोहित शर्मा?

मेजर मोहित शर्मा हे भारतीय लष्करातील विशेष दलाचे अधिकारी होते. २००९ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आले. देशासाठी केलेल्या या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर 'अशोक चक्र' या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याआधी त्यांनी २००४ मध्ये दोन दहशतवाद्यांना ठार मारले होते, या कामगिरीसाठी त्यांना सेना पदकही मिळाले होते.

शर्मा यांचा १९७८ मध्ये रोहतक येथे जन्म झाला होता. १९९५ मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मध्ये ते दाखल झाले. भारतीय सैन्य अकादमीतून उत्तीर्ण झाल्यावर डिसेंबर १९९९ मध्ये ते 'द मद्रास रेजिमेंटच्या' ५ व्या बटालियनमध्ये अधिकारी म्हणून रुजू झाले.

राष्ट्रीय रायफल्समध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये काही काळ सेवा केल्यानंतर, त्यांनी स्वतःहून विशेष दलात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. प्रशिक्षणानंतर ते १ पॅराशूट बटालियन मध्ये दाखल झाले. याच बटालियनमध्ये असताना त्यांना सेना पदक मिळाले. २००४ मध्ये त्यांनी एका हिजबुल मुजाहिद्दीन गटात वेषभूशा करून यशस्वीरित्या घुसखोरी केली होती.

२००९ मध्ये, मेजर शर्मा यांना पुन्हा जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथे एका कारवाईत भाग घेतला, ज्यात अनेक अतिरेकी मारले गेले, परंतु या दरम्यान ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना वीरमरण आले.

Dhurandhar
Afghanistan viral video: कुटुंबाची हत्या करणाऱ्या आरोपीला १३ वर्षांच्या मुलाने दिली फाशी! ८०,००० लोकांसमोर घेतला थरारक बदला!

कुटुंबीयांचा धुरंधर चित्रपटावर आक्षेप काय?

मोहित शर्मा यांच्या आई-वडिलांनी ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'धुरंधर' चित्रपटाच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपल्या मुलाच्या प्रतिमेचे संरक्षण व्हावे, यासाठी त्यांनी मागणी केली आहे. तसेच, प्रदर्शनापूर्वी चित्रपटाचे खासगी स्क्रिनिंग कुटुंबासाठी आयोजित करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. रणवीर सिंहने केलेली भूमिका ही मेजर शर्मांच्या वास्तविक कथा आणि कारवाईवर आधारित आहे. पाकिस्तानमध्ये घुसखोरी करून दहशतवादी अड्डा उद्ध्वस्त करण्याची कथा दाखवण्यात आली आहे. यासाठी आमच्या कुटुंबाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही, असा शर्मा यांच्या कुटुंबीयांचा आक्षेप आहे.

धुरंधर चित्रपट काल्पनिक असल्याचा निर्मात्यांचा दावा

या वादावर चित्रपट निर्माते आदित्य धर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी न्यायालयात सांगितले की, 'धुरंधर' हा चित्रपट पूर्णपणे काल्पनिक आहे. हा चित्रपट खऱ्या घटनांवरून घेतला असला तरी, त्याचा मेजर मोहित शर्मा यांच्या जीवनाशी थेट कोणताही संबंध नाही. दरम्यान, सेन्सॉर बोर्डने २ डिसेंबर रोजी चित्रपटाला प्रदर्शनासाठी हिरवा कंदिल दिला आहे.

Dhurandhar
Pakistan FC headquarters attack: पाकिस्तानात चिनी प्रकल्पावर BLF चा आत्मघाती हल्ला; महिलेने पाक सैनिकांसह स्वतःला बॉम्बने उडवले!

न्यायालय काय म्हणाले?

न्यायालयाने ही याचिका निकाली काढली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र देण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने याचिकाकर्त्यांच्या सर्व संबंधित बाबींचा विचार करावा. आवश्यक वाटल्यास, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने भारतीय लष्कराच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करावी, असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news