

इंटरनेट मूव्ही डेटाबेस (आयएमडीबी) ने 2025 मधील सर्वात लोकप्रिय भारतीय स्टार्सची यादी जाहीर केली आहे. यंदाच्या यादीत सर्वांना आश्चर्यचकित करत दोन नवोदित कलाकारांनी शाहरूख खान, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, आमीर खान, रजनीकांत यांसारख्या सुपरस्टार्सला मागे टाकत टॉप स्थान पटकावले आहे.
मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ या रोमँटिक ड्रामाच्या विक्रमी यशामुळे त्यातील मुख्य कलाकार अहान पांडे आणि अनीत पड्डा रातोरात स्टार बनले. आयएमडीबीच्या 2025 च्या लोकप्रिय भारतीय कलाकारांच्या यादीत अहान पांडे पहिल्या क्रमांकावर, तर त्याची सहकलाकार अनीत पड्डा दुसर्या स्थानावर आहे. जगभरातील 250 दशलक्षांहून अधिक व्हिजिटर्सच्या पेज-व्हिजिट डेटाच्या आधारे ही रँकिंग तयार करण्यात आली आहे. अहान म्हणाला की, ‘स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. या यशामुळे माझ्या कामाबद्दलची जबाबदारी अधिक वाढली आहे.’ अनीत म्हणाली की, ‘या यादीत नाव येणे स्वप्नवत आहे. ‘सैयारा’ने माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. वेगवेगळ्या देशांतल्या लोकांपर्यंत माझं काम पोहोचत आहे, हेच माझ्यासाठी सर्वात मोठं यश आहे.’
आयएमडीबी 2025 टॉप टेन लोकप्रिय भारतीय कलाकार
अहान पांडे
अनीत पड्डा
आमीर खान
लक्ष्य लालवानी
कल्याणी प्रियदर्शन
ऋषभ शेट्टी
रुक्मिणी वसंत
ईशान खट्टर
रश्मिका मंदाना
तृप्ती डिमरी