Dhurandhar 2 Box Office: ‘धुरंधर 2’चा धमाका सुरुच; 7 दिवसांत मोडले 7 महारेकॉर्ड, किती कोटींची कमाई केली?

Dhurandhar 2 Box Office Collection: ‘धुरंधर: द रिवेंज’ने अवघ्या 7 दिवसांत 1000 कोटींच्या जवळ पोहोचत मोठी कमाई केली आहे. चित्रपटाने ‘जवान’ आणि ‘एनिमल’च्या सुरुवातीच्या कमाईचे विक्रम मोडले आहेत.
Dhurandhar 2 Box Office
Dhurandhar 2 Box OfficePudhari
Published on
Updated on

Dhurandhar 2 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर सध्या एकच नाव गाजत आहे ‘धुरंधर: द रिवेंज’. रिलीज झाल्यानंतर अवघ्या 7 दिवसांत या चित्रपटाने असा धमाका केला आहे की बॉलिवूडमधील मोठमोठे रेकॉर्ड्स मोडले आहेत. ‘धुरंधर: द रिवेंज’ने पहिल्या आठवड्यातच कमाईचा तुफान वेग कायम ठेवत जागतिक स्तरावर जवळपास 1000 कोटींचा टप्पा गाठला आहे. इतक्या कमी वेळात एवढी कमाई होईल, याची अपेक्षा खुद्द निर्मात्यांनाही नव्हती.

चित्रपटाने:

  • भारतात: 623.42 कोटी रुपये

  • ओव्हरसीज: 250 कोटी रुपये

  • एकूण (वर्ल्डवाइड): 994.58 कोटी रुपये (1000 कोटींच्या उंबरठ्यावर) कमावले आहेत.

Dhurandhar 2 Box Office
Dr. Jaysingrao Pawar: मराठेशाहीचा खरा इतिहासकार हरपला... डॉ. जयसिंगराव पवार यांनी घेतला अखेरचा श्वास

सातव्या दिवशी किती कमाई?

सातव्या दिवशी चित्रपटाने 47.70 कोटी रुपये कमावले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात कमी कमाई असली तरी हा आकडा वाढू शकतो.

भाषेनुसार कमाई:

  • हिंदी: 44 कोटी

  • तेलुगू: 2.50 कोटी

  • तमिळ: 0.85 कोटी

  • कन्नड: 0.20 कोटी

  • मल्याळम: 0.15 कोटी

या दिवशी सुमारे 20,000 पेक्षा जास्त शो हाऊसफुल होते आणि ऑक्युपन्सी 34% होती.

Dhurandhar 2 Box Office Collection
Dhurandhar 2 Box Office CollectionPudhari

‘जवान’ आणि ‘एनिमल’लाही मागे टाकलं?

एनिमल आणि जवान या मोठ्या हिट चित्रपटांशी ‘धुरंधर 2’ची तुलना होत होती. मात्र, या चित्रपटाने फक्त 7 दिवसांतच त्या दोन्ही चित्रपटांच्या कमाईला मागे टाकत मोठा विक्रम केला आहे. यामुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा मोठ्या कमाईचा ट्रेंड दिसून येतोय.

Dhurandhar 2 Box Office
Petrol-Diesel Shortage: देशातलं पेट्रोल आणि डिझेल खरचं संपलं आहे का? तेल कंपन्यांनी काय सांगितलं?

पुढचं लक्ष्य ‘पुष्पा 2’?

आता या चित्रपटासमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते Pushpa 2 चं. कारण या चित्रपटानेही देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा दबदबा निर्माण केला होता. जर ‘धुरंधर 2’ने दुसऱ्या वीकेंडलाही अशीच कमाई कायम ठेवली, तर हा चित्रपट अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड्स मोडू शकतो.

वीकडेजमध्येही दमदार कमाई

वीकडेजमध्ये चित्रपटांची कमाई कमी होते. पण ‘धुरंधर 2’ने वीकडेजमध्येही जबरदस्त कमाई केली आहे. ‘धुरंधर: द रिवेंज’ हा फक्त एक चित्रपट नाही, तर बॉक्स ऑफिसवरचा एक मोठा रेकॉर्ड आहे. अवघ्या 7 दिवसांत 1000 कोटींच्या जवळ पोहोचणं हे बॉलिवूडसाठी मोठं यश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news