Dr. Jaysingrao Pawar: मराठेशाहीचा खरा इतिहासकार हरपला... डॉ. जयसिंगराव पवार यांनी घेतला अखेरचा श्वास

Dr. Jaysingrao Pawar
Dr. Jaysingrao Pawarpudhari
Published on
Updated on

Dr. Jaysingrao Pawar Passes Away: महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे आज (दि. २६ मार्च) पहाटे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. जयसिंगराव पवार हे ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ होते तसेच त्यांनी महाराष्ट्राच्या विशेष करून मराठ्यांच्या इतिहासावर बरेच लिखाण केलं होतं.

ते राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचे खंदे समर्थक होते. तसेच ऐतिहासिक संदर्भ, कादगपत्रे आणि पुराव्यावर आधारित इतिहास लेखनाचा त्यांचा आग्रह होता. त्यामुळं महाराष्ट्रात इतिहासासंदर्भातील त्यांच्या मताला एक वेगळीच किंमत होती. गेले काही दिवस त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची आज पहाटे प्राणज्योत मालवली.

Dr. Jaysingrao Pawar
Rohit Pawar On FIR : त्या मोठ्या अधिकाऱ्याला कोणाचा फोन आला... FIR गोंधळाबाबत रोहित पवार स्पष्टच बोलले

असा असेल अंत्ययात्रेचा मार्ग

जयसिंगराव पवार यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात अंत्य संस्कार होणार आहेत. अंत्ययात्रा साने गुरूजी वसाहत येथील त्यांच्या निवासस्थानाहून सकाळी ९.१५ वा. निघेल. अंत्ययात्रेचा मार्ग हा साने गुरूजी वसाहत शिवजेत बंगला, जुना वाशी नाका, उभा मारूती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, खासबाग, बिंदू चौक, पद्मा टॉकीज, दसरा चौक, राजर्षी शाहू महाराज स्मृतीस्थळ, जुना बुधवार पेठ तोरस्कर चौक ते पंचगंगा स्माशनभूमी अशी निघणार आहे.

दरम्यान, जयसिंगराव पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच ज्येष्ठ नेते शरद पवार पुण्यातून अंत्यदर्शनासाठी कोल्हापूरला निघाले आहेत अशी माहिती मिळत आहे.

Dr. Jaysingrao Pawar
Rohit Pawar Press Conference: झिरवाळ प्रकरणात सगळे शांत... त्यातच रोहित पवारांनी विलिनीकरणाबाबतची पत्रकार परिषद पुन्हा पुढं ढकलली

अनेकांना पाजले इतिहासाचे बाळकडू

डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिवकालीन इतिहास आणि मराठ्यांच्या इतिहासाच्या संशोधनासाठी वेचले. त्यांचे संशोधन अत्यंत वस्तुनिष्ठ आणि पुराव्यांवर आधारित होते. राजर्षी शाहू महाराजांचे सर्वांगीण चरित्र जगासमोर मांडण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

त्यांनी संपादित केलेले 'राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ' आजही संशोधकांसाठी दीपस्तंभ आहेत. याचबरोबर त्यांनी 'मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध', 'मराठी सत्तेचा उदय' आणि छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित अनेक ग्रंथ लिहिले

जयसिंगराव पवार यांनी इतिहास प्रेमींच्या अनेक पिढ्या घडवल्या. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागात त्यांनी प्रदीर्घ काळ सेवा दिली. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी इतिहास संशोधनाचे बाळकडू पाजले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news