Dhurandhar 2 Global collection |'धुरंधर २'ची दहशत कायम, १५०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच सामील? पण उद्या रिलीज होणारे 'हे' चित्रपट देणार का टक्कर?

Dhurandhar 2 Global collection |'धुरंधर २'ची दहशत कायम, १५०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच सामील? पण उद्या रिलीज होणारे 'हे' चित्रपट देणार का टक्कर?
ranveer singh
Dhurandhar 2 worldwide collection pudhari photo
Published on
Updated on
Summary

रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar 2) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या १४ दिवसांत या चित्रपटाने जगभरात १४६६.४७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून, १५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी हा चित्रपट आता सज्ज झाला आहे. उद्या ३ एप्रिल रोजी असलेल्या 'गुड फ्रायडे'च्या सुट्टीमुळे या चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. पण, त्याच वेळी रिलीज होणारा दुसऱ्या बॉलिवूडपटाचे मोठे आव्हान असणार आहे.

Dhurandhar 2 Global collection will set mark 1500 crore on box office

सध्या एकच नाव गाजतंय, ते म्हणजे 'धुरंधर: द रिव्हेंज'. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला आणि आदित्य धर दिग्दर्शित स्पाय थ्रिलर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः वादळ निर्माण केले आहे. रिलीजच्या १४ दिवसांनंतरही या चित्रपटाची क्रेझ कमी होण्याचे नाव घेत नाहीये. आता सर्वांचे लक्ष एकाच गोष्टीकडे लागले आहे ते म्हणजे हा चित्रपट १५०० कोटींचा टप्पा कधी ओलांडणार?

१४ दिवसांत किती कमाई?

रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंहचा ॲक्शनने भरलेला चित्रपट आपली ऐतिहासिक घोडदौड कायम ठेवून आहे. दुसऱ्या बुधवारी या चित्रपटाने २०.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. देशात ९२०.०२ कोटींचा गल्ला जमवला आहे. आता चित्रपटाची वर्ल्डवाईट कमाई १४६६.४७ कोटी रुपयांवर गेली आहे. १३ व्या दिवशी चित्रपटाने २७.७५ कोटी रुपयांची कमाई केली होती.

ranveer singh
Marathi Movie Release | ललित प्रभाकरचा नवा लूक की पूजा-प्रार्थनाचे सौंदर्य? प्रेक्षक कोणाला पसंती देणार?

धुरंधर २ - १५ व्या दिवसांचा गल्ला

ट्रेड रिपोर्टनुसार, 'धुरंधर २' ची घोडदौड १५ व्या दिवशीही सातत्याने सुरू आहे. सध्या हा चित्रपट देशभरात ८,१४५ शोजमध्ये रिलीड झालाय. दुपारपर्यंत त्याने ४.१८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह, चित्रपटाची भारतातील एकूण 'नेट' कलेक्शन ९२४.२० कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तर भारतातील एकूण 'ग्रॉस' कमाई १,१०६.४० कोटी रुपये इतकी झाली आहे.

'धुरंधर २' ने अवघ्या दोन आठवड्यांत जगभरात हे कलेक्शन केले आहे. भारतात हा आकडा लवकरच १००० कोटींचा आकडा पार करेल, असे म्हटले जात आहे. 'पुष्पा २' आणि 'बाहुबली २' सारख्या सुपरहिट चित्रपटांचे रेकॉर्ड्स धुरंधर २ ने काढले आहे.

उद्या रिलीज होणारे चित्रपट आणि 'गुड फ्रायडे'ची सुट्टी

उद्या शुक्रवार, ३ एप्रिल रोजी 'गुड फ्रायडे' निमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. या विकेंडचा फायदा आता धुरंधर २ ला तर होणारच आहे. शिवाय, काही नवीन चित्रपट देखील रिलीज होतोय.

ranveer singh
Movie Raja Shivaji| स्वराज्याचा थरार आता डिजिटलवर! 'राजा शिवाजी' टीझर पाहून चाहते झाले भावूक; रितेशच्या दिग्दर्शनाची सर्वत्र चर्चा!

बॉलिवूडमध्ये 'आवारपन २' :

ॲक्शन, रोमान्स, ड्रामा असलेला आवारापन २ उद्या ३ तारखेलाच रिलीज होतोय. हा २००७ च्या आवारापनचा सीक्वेल आहे. इम्रान हाश्मीचा मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक वर्ग किती दाद देतो, हे पाहण्यासाठी उत्सुकता आहे. मात्र, 'धुरंधर २' च्या वादळासमोर इम्रान हाशमी तग धरू शकणार का? सुट्टीच्या दिवशी प्रेक्षक कोणत्या थिएटरकडे वळणार? हे पाहणे रंजक असेल.

'धुरंधर २' ची कमाई पाहता या विकेंडला म्हणजे उद्याच्या सुट्टीच्या दिवशी हा चित्रपट १५०० कोटींचा टप्पा गाठेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नवीन येणाऱ्या चित्रपटांची टक्कर देखील उद्याच्या दिवशी पाहायला मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news