Marathi Movie Release | ललित प्रभाकरचा नवा लूक की पूजा-प्रार्थनाचे सौंदर्य? प्रेक्षक कोणाला पसंती देणार?

Marathi Movie Release | विकेंडला सुट्टीचा धमाका! उद्या प्रदर्शित होतायत 'हे' २ मोठे मराठी चित्रपट; पाहा कोण मारणार बाजी?
image of marathi movie poster
Marathi Movie Release tomarrow pudhari photo
Published on
Updated on
Summary

उद्या ३ एप्रिल २०२६ रोजी 'गुड फ्रायडे'च्या सुट्टीचे औचित्य साधून मराठी सिनेसृष्टीतील दोन बहुप्रतीक्षित चित्रपट रिलीज होत आहेत. एकीकडे ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले यांची रोमँटिक केमिस्ट्री आणि विनोदाचा तडका पाहायला मिळेल, तर दुसऱ्या चित्रपटात पूजा सावंत, प्रार्थना बेहेरे आणि अभिजित खांडकेकर यांच्यातील कौटुंबिक नात्यांचा प्रवास अनुभवता येईल. या दोन्ही चित्रपटांमध्ये कोण बाजी मारणार आणि प्रेक्षक कोणाला पसंती देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या विकेंडला महत्वाचे दोन चित्रपट रिलीज होताहेत. एकापेक्षा एक धुरंधर कलाकारांच्या अभिनयाने नटलेले हे चित्रपट एकाच दिवशी शुक्रवार, ३ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येताहेत. ३ तारखेला 'गुड फ्रायडे'ची सार्वजनिक सुट्टी असल्याने चित्रपट प्रेमींसाठी हा आठवडा खास ठरणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दोन मोठे चित्रपटांचा उद्या बॉक्स ऑफिसवर आमनासामना होणार आहे.

एका बाजूला तरुणाईचा लाडका अभिनेता ललित प्रभाकरचा रोमँटिक अवतार आहे, तर दुसऱ्या बाजूला पूजा सावंत आणि प्रार्थना बेहेरे यांची अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. पूजा आणि प्रार्थना दोघीही सुंदर अभिनेत्री तर ललितचा चाहता वर्गही प्रचंड आहे. त्यामुळे ललित प्रभाकरचा नवा लूक की पूजा-प्रार्थनाचे सौंदर्य? प्रेक्षक कोणाला पसंती देणार हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळणार आहे.

image of marathi movie poster
Rajesh Khanna |अभिनेत्री अनिता अडवाणींना हायकोर्टाचा झटका! सुपरस्टार राजेश खन्नांसोबतच्या नात्याबाबत स्पष्टच सांगितलं

'सुपर डुपर' चित्रपट :

विनोदाची आणि प्रेमाची मेजवानी असलेला सुपर डुपर चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर आणि सोशल मीडिया सेन्सेशन विदुला चौगुले यांची फ्रेश जोडी भेटीला येत आहे. या चित्रपटाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर रंगली आहे.

काय आहे खास?

या चित्रपटात केवळ रोमान्स नाही, तर विनोदाचा तडकाही आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेराव आणि दिग्गज अभिनेते समीर पाटील यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. दोघांचीही कॉमिक टायमिंग उत्तम असल्याने हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवेल, असे म्हटले जात आहे.

ललितचा नवा लूक:

या चित्रपटासाठी ललितने केलेला मेकओव्हर आणि विदुलासोबतची त्याची केमिस्ट्री तरुणाईला आकर्षित करणारी ठरणार आहे.

झी स्टुडिओजची प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित ‘सुपर डुपर’ हा कौटुंबिक मनोरंजनाचा महासोहळा येत्या ३ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समीर आशा पाटील दिग्दर्शित 'सुपर डुपर‘ या चित्रपटाचे विजय शिंदे आणि नरेश बोर्डे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता असून छायांकन संजय जाधव यांनी केले आहे.

image of marathi movie poster
Rajesh Khanna |अभिनेत्री अनिता अडवाणींना हायकोर्टाचा झटका! सुपरस्टार राजेश खन्नांसोबतच्या नात्याबाबत स्पष्टच सांगितलं

'सखे गं सजणी' चित्रपट :

कौटुंबिक नात्यांची गुंफण असणारा आणि दुसऱ्या बाजूला, ग्लॅमर आणि उत्कृष्ट अभिनय असलेला 'सखे गं सजणी' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. दोन सुंदर अभिनेत्री पूजा सावंत आणि प्रार्थना बेहेरे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सोबतीला अभिजित खांडकेकर मुख्य भूमिकेत असून हा चित्रपट ३ एप्रिलला रिलीज होतोय.

कोणी पाहावा हा चित्रपट?

मित्रांसोबतच्या प्रवासावर आधारित सर्वांनी पाहावा अशा आहे. तीन मित्रांच्या प्रवासाची, त्यांच्या नात्यांचे सुंदर चित्रण पाहायला मिळणार आहे. याआधी चित्रपटातील दोन गाणी रिलीज झाले आहेत. त्यापैकी एक सखे गं साजणीचे टायटल सॉन्ग होते. हे गाणे अभिजीत सावंतने गायले आहे. तर संगीत विजय भाटे यांचे आहे.

तसेच, ‘डीजे चा बास’ हे आणखी एक गाणेही भेटीला आले. या गाण्याचे शब्द लखन चौधरी यांनी लिहिले आहेत. हे गाणे करण सावंत आणि श्वेता ठाकूर यांनी गायले असून, त्याचे संगीतही विजय भाटे यांनी दिले आहे. पूजा आणि प्रार्थना यांचे पारंपरिक नऊवारी लूक आणि गाण्यांनी आधीच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे.

बॉक्स ऑफिसवर कोण मारणार बाजी?

गुड फ्रायडेच्या सुट्टीमुळे दोन्ही चित्रपटांना 'लॉन्ग विकेंड'चा फायदा मिळू शकतो. 'सुपर डुपर' हा प्रामुख्याने तरुणाईने पाहावा असा आहे. ललित प्रभाकरचा डॅशिंग लूक की पूजा-प्रार्थनाचे सौंदर्य कुणाची जादू चालणार? दुसरीकडे, 'धुरंधर द रिव्हेंज' धडाक्यात सुरु असताना आता हे दोन्ही मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news