Dharmaveer - 2 |प्रतीक्षा करा! यादिवशी येतोय चित्रपट "धर्मवीर - २"

"धर्मवीर - २" यादिवशी जगभरात प्रदर्शनासाठी सज्ज
Dharmaveer - 2 Movie
धर्मवीर २ चित्रपट या दिवशी प्रदर्शित होणार आहेMangesh Desai Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. काही गावे पाण्याखाली गेली तर काही गावांचा संपर्कही तुटला होता. राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहून "धर्मवीर - २" ह्या ९ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय हा चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई आणि उमेश कुमार बन्सल ह्यांनी घेतला. ह्या अनोख्या निर्णयाचे सगळीकडे विशेष कौतुकहीं करण्यात आले होते.

Dharmaveer - 2 Movie
Jai Jai Swami Samarth | स्वामींमधील शिवतत्वाच्या दिव्य अनुभूतीचा होणार प्रारंभ

सध्याची परिस्थिती ही नियंत्रणात असून अजून दीड महिन्याचा अवधी घेऊन येत्या २७ सप्टेंबरला "धर्मवीर २" हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय आता निर्मात्यांनी घेतला आहे.

Dharmaveer - 2 Movie
BB Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात पार पडणार पहिलं नॉमिनेशन

चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली. प्रदर्शनाची तारीख पुढे गेल्यावर चित्रपटगृहांकडून विचारणा होत होती. अनेक ग्रुप बुकिंगसाठी थांबलेले होते. परदेशातून प्रदर्शनासाठी विचारणा होत होती. सोशल मीडियावरही चित्रपट कधी प्रदर्शित होणार? याची विचारणा अनेकजण करत होते. आता प्रेक्षकांना चित्रपटासाठी केवळ २७ सप्टेंबर पर्यंत अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.

Dharmaveer - 2 Movie
Bigg Boss Marathi| 'आला रे आला... भाऊचा धक्का'; नवं गाणं ऐकलं का?

"धर्मवीर - २" हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news