Bigg Boss Marathi| 'आला रे आला... भाऊचा धक्का'; नवं गाणं ऐकलं का?

'लपून सारी, बघुन बारी, डोक्यात त्याच्या गेलंया', बिग बॉसचं नवं गाणं भेटीला
Bigg Boss Marathi
बिग बॉसचं नवं गाणं भेटीला आलं आहेInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टेलिव्हिजनचा सर्वात मोठा कार्यक्रम अर्थात 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाची सर्वत्र चांगलीच हवा आहे. रितेश भाऊची हटके स्टाईल आणि १६ सदस्यांचा हटके खेळ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. काहीच तासांत यंदाच्या सीझनचा पहिला 'भाऊचा धक्का' पार पडणार आहे. या 'भाऊच्या धक्क्या'वर सदस्यांची पोलखोल होणार आहे. पण त्याआधीच 'भाऊचा धक्का' हे गाणं 'बिग बॉस'प्रेमींच्या भेटीला आलं आहे.

Bigg Boss Marathi
BBOTT 3 Sana Makbul : सना मकबूलला ट्रॉफीसोबत मिळाले इतक्या लाखांचे बक्षीस

'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन पूर्णपणे वेगळा आहे. रितेश भाऊ त्याच्या स्टाईलने कल्ला करत यंदाचा सीझन रंगवताना दिसत आहे. आता आपल्या हक्काच्या भाऊच्या धक्क्यावर भाष्य करणारं एक नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

"लपून सारी, बघुन बारी, डोक्यात त्याच्या गेलंया, साऱ्यांना टाईट, करणार राईट, हिशोब त्यानं केलंया, हटके स्टाईल, किलर स्माईल, धिंगाना याचा करलं", असे या गाण्याचे बोल आहेत. रितेश भाऊ कोणाची शाळा घेईल तर कोणाचं कौतुक करेल. एकंदरीतच भाऊच्या धक्क्यावर तो स्पर्धकांचा हिशोब घेणार आहे. त्यामुळे कल्ला तर होणारच...

Bigg Boss Marathi
Big Boss OTT3 : बिग बॉस ओटीटीच्या ट्रॉफीवर सना मकबुलने कोरले नाव

'भाऊचा धक्का' या गाण्यात रितेश भाऊचा रुबाब पाहायला मिळत आहे. त्याचा हटके स्वॅग स्टाईल आणि उत्साह या गाण्यात परफेक्ट दिसून येत आहे. रितेश भाऊ 'भाऊच्या धक्क्यावर' घरातील सदस्यांचा हिशोब पक्का करणार आहे. त्यामुळे हा 'भाऊचा धक्का' चांगलाच गाजणार.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news