BB Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात पार पडणार पहिलं नॉमिनेशन

कोणाला सोडावं लागणार 'बिग बॉस'चं घर?
Bigg Boss Marathi New Season Day 4
बिग बॉसच्या घरात पहिलं नॉमिनेशन पार पडणार आहेInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस मराठी' आणि टास्क हे एक समीकरणच आहे. स्पर्धकांना घरात टिकून राहण्यासाठी हुशारीने टास्क खेळावेच लागतात. प्रीमियरपासूनच 'बिग बॉस' स्पर्धकांना पेचात पाडत आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचं सर्वत्र कौतुक होत असून घरातील सदस्यांचे भांडण, राडे, धमाल, मजा-मस्ती 'बिग बॉस'प्रेमींच्या पसंतीस उतरत आहेत. 'बिग बॉस मराठी' सुरू होऊन चार दिवस पूर्ण झाले असून चौथ्या दिवशीच घरात पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.

Bigg Boss Marathi New Season Day 4
Instagram
Bigg Boss Marathi New Season Day 4
BB Marathi 5 : योगिता चव्हाण अन् जान्हवी किल्लेकरमध्ये पडली वादाची ठिणगी

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये आज नॉमिनेशन कार्याचा प्रारंभ होणार आहे. याबाबतचा प्रोमोदेखील आऊट झाला आहे. 'नॉमिनेशनची तोफ' असं या पहिल्या नॉमिनेशन कार्याचं नाव आहे. प्रतिस्पर्ध्याला घराबाहेर काढण्यासाठी 'बिग बॉस'ने 'नॉमिनेशन तोफ' या कार्याचा अवलंब केला आहे. पहिल्याच कार्यादरम्यान 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi New Season Day 4
Instagram
Bigg Boss Marathi New Season Day 4
BB Marathi 5 : योगिता चव्हाण अन् जान्हवी किल्लेकरमध्ये पडली वादाची ठिणगी

टास्कसाठी भिडताना अंकिता आणि निक्कीमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाचीदेखील झालेली पाहायला मिळेल. राड्यादरम्यान या दोन सदस्य टास्क कसा पूर्ण करणार हे पाहणं मनोरंजक ठरेल. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये पहिल्या आठवड्यात कोणते सदस्य सेफ होणार आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. एक घर, १०० दिवस आणि १६ स्पर्धकांचा प्रवास आता सुरू झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळत आहे.

Bigg Boss Marathi New Season Day 4
BBMarathi 5 : 'या' कारणाने 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरला कोसळलं रडू

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news