

ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी अनेक वर्षे सिंगल आयुष्य जगल्यानंतर वयाच्या साठीनंतर प्रेमाचा नवा अध्याय सुरू केला. फेसबुकवरून झालेल्या ओळखीमुळे त्यांची भेट भौतिकशास्त्रज्ञ अतुल गुर्टू यांच्याशी झाली आणि पुढे दोघांनी विवाह केला. त्यांची ही अनोखी प्रेमकहाणी आजही अनेकांसाठी प्रेरणादायी मानली जाते.
या हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. मात्र त्यांच्या व्यावसायिक आयुष्याइतकीच त्यांची वैयक्तिक प्रेमकहाणीही रंजक आणि प्रेरणादायी आहे.
'लगान', 'जोधा अकबर', 'दिल चाहता है' यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या सुहासिनी मुळे यांनी अनेक वर्षे एकट्याने आयुष्य व्यतीत केले. वाढत्या वयात प्रेम आणि विवाहाचा विचार करणेही त्यांनी जवळपास सोडून दिले होते. "आता या वयात कोण जीवनसाथी मिळणार?" असा प्रश्न त्यांच्या मनात अनेकदा येत असे.
अभिनेत्री सुहासिनी मुळेंनी वयाच्या ६० व्या वर्षी थाटला संसार
सुहासिनी यांना खंर प्रेम न मिळाल्यामुळे त्या सिंगल राहिल्या. पण, फेसबुकचे जेव्हा अकाऊंट ओपन केले. तेव्हा त्यांना एका शास्त्रज्ञाचे प्रोफाईल दिसले. सुहासिनी यांना विज्ञानात आवड अशल्यामुळे त्यांनी त्यांनी मेसेज केला. त्यांची ओळख झाली आणि ते फेसबुकवर बोलू लागले. होलताना ते म्हणाले की, ते पार्टनरच्या शोधात आहेत. विज्ञानाच्या गोष्टी ते सांगायचे. पण सुहासिनी यांना फार समजायचे नाही. पण एक व्यक्ती म्हणून ते खूप चांगले असल्याचे सुहासिनी म्हणतात. त्यावेळी सुहासिनी यांना वाटत होतं की आपल्याला ६० वर्षी कोण पार्टनर मिळेल. यानंतर ते प्रत्यक्षात भेटले. भेटल्यानंतर अवघ्या ७५ दिवसांतच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
कोण आहे सुहासिनी मुळे यांचे पती?
अतुल गुर्टू असे सुहासिनी यांच्या पतीचे नाव आहे. ते एक शास्त्रज्ञ आहेत. दरम्यान, फेसबूकवर संवादादरम्यान, अतुल यांनी सुहासिनी मुळे यांच्याकडे त्यांचा फोन नंबर मागितला होता. त्यावर सुहासिनी यांनी स्पष्ट नकार देत मिश्कीलपणे सांगितलं की, "चांगल्या मुली अनोळखी व्यक्तींना आपला फोन नंबर देत नाहीत." त्यानंतर सुहासिनी यांनी थेट गुगलवर अतुल यांच्या फोटोंची आणि त्यांनी काम केलेल्या वैज्ञानिक संस्थेतील माहितीची तपासली. अखेर असे गोड प्रेम एकमेकांना मिळाले!