Deepika Padukone: दीपिका-रणवीर पुन्हा आई-बाबा होणार; मुलगी 'दुआ'च्या हातात प्रेग्नन्सी किट देऊन शेअर केली गुडन्यूज

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी त्यांच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. ही जोडी दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहे.
Deepika Padukone
Deepika PadukoneDeepika Padukone instagram
Published on
Updated on

Deepika Padukone second pregnancy

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी त्यांच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. ही जोडी दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असून, रविवारी सोशल मीडियाद्वारे त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली. या घोषणेनंतर सिनेसृष्टीसह चाहत्यांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

दीपिका आणि रणवीरने इन्स्टाग्रामवर एक अतिशय गोंडस फोटो शेअर करत ही माहिती दिली. या फोटोमध्ये त्यांची मुलगी 'दुआ' हातामध्ये प्रेग्नन्सी टेस्ट किट धरलेली दिसत असून त्यावर पॉझिटिव्ह रिझल्ट दिसत आहे. या पोस्टला त्यांनी कोणतेही मोठे कॅप्शन न देता केवळ 'इव्हिल आय' ईमोजी वापरले आहेत. अवघ्या काही मिनिटांतच ही पोस्ट व्हायरल झाली असून दोघांच्याही कमेंट सेक्शनमध्ये शुभेच्छांचा पाऊस सुरू आहे.

Deepika Padukone
Love and War| बॉक्स ऑफिसवर येणार प्रेमाचं वादळ! रणबीर, आलिया अन् विकी कौशलच्या 'लव्ह अँड वॉर'ची रिलीज डेट जाहीर

२०२४ मध्ये झाला होता दुआचा जन्म

दीपिका आणि रणवीरने दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८ मध्ये इटलीत शाही विवाह केला होता. त्यानंतर ८ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांना पहिले कन्यारत्न झाले. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांनी आपल्या लेकीचे नाव 'दुआ' असल्याचे जाहीर केले होते. आता दुआच्या जन्मानंतर काही काळातच हे दांपत्य दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

दोघांचीही 'वर्क फ्रंट'वर भरारी

आनंदाच्या या बातमीसोबतच हे दोन्ही कलाकार सध्या आपल्या करिअरमध्येही व्यस्त आहेत. रणवीरचा 'धुरंधर २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शनाला महिना उलटून गेल्यानंतरही या चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. दीपिकाचे आगामी प्रोजेक्ट्स देखील तितकेच चर्चेत आहेत. सिद्धार्थ आनंदच्या 'किंग' या चित्रपटात ती शाहरुख खानसोबत दिसणार आहे. याशिवाय, दिग्दर्शक ॲटली यांच्या आगामी 'AA22xA6' या चित्रपटात ती साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत पाहायला मिळणार आहे.

Deepika Padukone
Anil Kapoor|"Nana's heart is full!" आजोबा होताच अनिल कपूर भावूक; नातवाच्या स्वागतासाठी लिहिली खास पोस्ट!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news