

संजय लीला भन्साली यांचा आजवरचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जाणारा 'लव्ह अँड वॉर' आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. २१ जानेवारी २०२७ ही तारीख या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी निश्चित करण्यात आली आहे. या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल ही तगडी स्टारकास्ट. प्रेम, मैत्री आणि विश्वासघात अशा त्रिकोणी संघर्षावर आधारित असलेला हा चित्रपट केवळ हिंदीतच नव्हे, तर तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित होणार असून, भव्य सेट आणि इमोशनल ड्रामाचा हा एक वेगळा अनुभव असेल.
Love and War released date announced
संजय लीला भन्साली यांच्या 'लव्ह अँड वॉर' (Love & War) या चित्रपटाची अधिकृत घोषणा झाल्यापासून सिनेप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. संजय लीला भन्साळींनी 'देवदास', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' सारखे अजरामर चित्रपट दिल्यानंतर आता भन्साळी नवा चित्रपट घेऊन येत आहेत, ज्याचं नाव आहे 'लव्ह अँड वॉर' (Love & War). या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता समोर आली असून, २१ जानेवारी २०२७ रोजी हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल हे तिन्ही सुपरस्टार पहिल्यांदाच एका फ्रेममध्ये दिसणार आहेत. रणबीर आणि आलियाच्या जोडीला प्रेक्षकांनी 'ब्रह्मास्त्र'मध्ये पाहिलं आहे. पण, आता दोघे भन्साळींच्या नव्या चित्रपटातून समोर येत आहेत. त्यांचा रोमान्स आणि त्यात विकी कौशलची एन्ट्री हा एक मोठा 'सिनेमॅटिक धमाका' असणार आहे. या चित्रपटात तिन्ही कलाकारांचा अभिनयाचा कस लागणार आहे.
कथेत काय असेल खास?
'लव्ह अँड वॉर' हे केवळ चित्रपटाचे नाव नाही, तर प्रेम, मैत्री आणि नात्यांमधील गुंतागुंत असा हा प्रवास असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा चित्रपट युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित एक प्रेमकथा असेल. यामध्ये विश्वासघात, वेदना आणि प्रेम पाहायला मिळेल.
हा चित्रपट केवळ हिंदी भाषेतच नाही तर दाक्षिणात्य प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी असेल. तो तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही डब केला जाणार आहे. भन्साळींचा हा चित्रपट भारतीय सिनेमातील सर्वात मोठी प्रेमकथा ठरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
२१ जानेवारी २०२७ रोजी 'लव्ह अँड वॉर' प्रदर्शित होईल. त्यामळे आलिया, विकी, रणबीर यांच्या चाहत्यांना आता प्रतीक्षा लागून राहिलीय.