

अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर तिचे वडील अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. "माझं हृदय आनंदाने भरून गेलंय," असं म्हणत त्यांनी आपल्या दुसऱ्या नातवाचं जंगी स्वागत केलं आहे. अनिल कपूर यांची ही 'इमोशनल' पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर दुसऱयांदा मुलाला जन्म दिला आहे. तिचे पती आनंद आहूजाच्या घरी २९ मार्च, २०२६ रोजी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे. कपलने सोशल मीडियावर ही आनंदाची वार्चा शेअर केली आहे. त्यानंतर सेलेब्स आणि फॅन्सकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, आजोबा अनिल कपूरने एक इमोशल पोस्ट इन्स्टाग्रामवर लिहिली आहे.
आज सकाळी अनिल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर आजोबा (Nana) झाल्याचा आनंद व्यक्त करणारी एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. "माझं हृदय अधिक मोठं झालंय" असं त्यांनी म्हटलंय.
नातवासाठी खास संदेश
अनिल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक अत्यंत गोंडस आणि अर्थपूर्ण पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी एक प्रतिकात्मक चित्र शेअर केलं आहे. त्यात म्हटलंय- ''आणि अगदी सहजपणे... माझे हृदय आणखीच विशाल झाले आहे. या जगात तुझे स्वागत, माझ्या चिमुकल्या; तुझ्यावर आधीच खूप नितांत प्रेम केले जात आहे. वायू, आता तू मोठा भाऊ झाला आहेस... आणि मला खात्री आहे की तू एक उत्तम मोठा भाऊ बनशील. धन्यवाद, सोनम आणि आनंद... आजोबांचे (Nana) हृदय आनंदाने भरून आले आहे. या धकाधकीच्या (आणि प्रेमळ) विश्वात तुझे स्वागत, माझ्या बाळा-आयुष्यभराच्या प्रेमाच्या प्रवासात तुझे स्वागत.''
सोनमने यापूर्वी इन्स्टाग्रामवर फोटोंची एक सीरीज पोस्ट करत तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. त्या पोस्टमध्ये, ती 'प्रिन्सेस डायना' यांच्या शैलीने प्रेरित असा 'हॉट-पिंक' रंगाचा लोकरीचा सूट परिधान केलेला होता; आणि त्या पोस्टला तिने 'MOTHER' असे टायटल दिले होते.
सोनमने २००७ मध्ये संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'सावरिया' या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर तिने 'दिल्ली ६', 'आयशा', 'रांझणा', 'खूबसूरत', 'डॉली की डोली' आणि 'वीरे दी वेडिंग' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती शेवटची 'ब्लाईंड' (२०२३) या क्राईम थ्रिलर चित्रपटात दिसली होती.