

अदिवी शेष आणि मृणाल ठाकूर यांची मुख्य भूमिका असलेला 'डकैत' हा चित्रपट १० एप्रिल २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. अॅक्शन आणि रोमान्सने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. विशेषतः तांत्रिक बाजू आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होत असून, चित्रपटाने जगभरात १३.५७ कोटी रुपयांहून अधिक कमाई करत दमदार सलामी दिली आहे. दुसरीकड, हिंदी बेल्टमध्ये म्हणावे तसे कलेक्शन झालेले दिसले नाही.
Dacoit Box Office Collection first day
मृणाल ठाकुर, अदिवी शेषचा चित्रपट 'डकैतः एक प्रेम कथा' चित्रपटगृहात रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. एकीकडे धुरंधर २ ची हवा असताना डकैतने ओपनिंग डेला किती कोटींचा गल्ला जमवला, हे जाणून घेऊया. पॅन इंडिया रिलीज झालेल्या 'डकैत'ने हिंदीमध्ये किती कोटींची कमाई केलीय, हे देखील जाणून घेऊया.
'धुरंधरः द रिवेंज' तीन आठवड्यांहून अधिक काळ लोटला तरी धुवाधार कमाई सुरु आहे. दरम्यान, दाक्षिणात्य अभिनेता अदिवी शेष आणि बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकूर यांचा बहुचर्चित 'डकैत' चित्रपट अखेर थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. अॅक्शन, थ्रिलर आणि प्रेमकथेचा मिलाफ असलेल्या या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे आकडे आता समोर आले आहेत.
पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन:
मीडिया रिपोर्टनुसार, 'डकैत'ने भारतामध्ये पहिल्या दिवशी सुमारे ६.५० कोटी रुपयांची निव्वळ (Net) कमाई केली आहे. वर्ल्डवाईड या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १३.५७ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तेलगू आवृत्तीने ५.६० कोटींच्या कमाईसह आघाडी घेतली असली, तरी हिंदी मार्केटमध्ये चित्रपटाला काहीशी संथ सुरुवात मिळाली आहे.
रोमँटिक ॲक्शन थ्रिलर असूनही नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. बॉक्स ऑफिसवर कासव गतीने कमाईची चाल सुरु असल्याचे दिसले.
'डकैत'ने तेलुगू बेल्टमध्ये ५.६० कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तर हिंदीमध्ये ९० लाख रुपयांचे कलेक्शन केले. चौथ्या आठवड्यात धुरंधर २ आतादेखील टक्कर देत असून आथा विकेंडचा फायदा डकैतला किती होणार, याकडे लक्ष लागले आहे.
रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी 'डकैत'ने ३ हजार ८०० शोजमध्ये एकूण ६.५० कोटी रुपयांची नेट कमाई केली. भारता ग्रॉस कमाई ७.५७ कोटी रुपये आणि एकूण कमाई ६.५० कोटी रुपये झाली आहे.
शनेल देवने दिग्दर्शित केलेला हा पिहली चित्रपट आङहे. मृणालचा उत्तम अभिनय आणि अदिवी शेषचा ॲक्शन परफॉर्मन्सचे कौतुक करताना प्रेक्षक दिसताहेत. चित्रपटात प्रकाश राज, अनुराग कश्यप देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आधी हा चित्रपट १९ मार्चला रिलीज होणार होता. अनेक प्रेक्षकांनी स्क्रिप्ट कमजोर असल्याचे सांगितलं.