पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीनच्या आरोग्या विषयी मोठी हेल्थ अपडेट समोर आली आहे. कॉन्टॅक्ट लेन्समुळे जस्मिन भसीनच्या डोळ्यांचा कॉर्निया डॅमेज झाला आहे. अभिनेत्रीने स्वत : ही माहिती दिली आहे. आता अभिनेत्री जस्मीन भसीन आपल्या रिकव्हरी विषयी अपडेट दिली आहे.
अभिनेत्री जस्मीन भसीनला एका कार्यक्रमासाठी लेन्स घातल्यानंतर डोळ्यांची गंभीर समस्या झाली होती. आता ती बरी होत आहे. जस्मीनने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मोठा काळा गॉगल घातलेला फोटो शेअर केला आहे. फोटोसोबत, तिने एक कॅप्शनदेखील लिहिलं आहे, "आता बरे आहे, ठिक होत आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वादासाठी धन्यवाद."
तिने सांगितलं की, १७ जुलै रोजी एक कार्यक्रम होता, ज्यामध्ये तिने कॉन्टॅक्ट लेन्स लावलं होतं. लेन्स लावल्यानंतर काही वेळाने तिला डोळ्यात दुखू लागलं होतं. त्यानंतर तिची स्थिती इतकी गंभीर झाली होती की, तिला दिसायचे बंद झाले होते. त्यानंतर जस्मिनला रुग्णालयात नेण्यात आलं होतं, तिथे तिच्यावर उपचार झाले. आता जस्मिनची प्रकृती पहिल्यापेक्षा ठिक आहे आणि तिच्यावर उपचार सुरु आहेत.
जस्मीनला टशन-ए-इश्कमध्ये ट्विंकल तनेजा आणि दिल से दिल तकमध्ये टेनी भानुशालीच्या भूमिकेत पाहण्यात आलं होतं. तिने खतरों के खिलाडी ९, फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी - मेड इन इंडिया आणि बिग बॉस १४ सारख्या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आहे.