Ayres Sasaki : भर कार्यक्रमात विजेचा झटक्याने आयरेस सासकी यांचे निधन

विजेचा झटक्याने गायक आयरेस सासकी यांचे निधन; नेमकं काय घडलं?
Ayres Sasaki
Ayres Sasaki : भर कार्यक्रमात विजेचा झटक्याने आयरेस सासकी यांचे निधनAyres Sasaki

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुप्रसिद्ध ब्राझील गायक आयरेस सासकी यांचे भर कार्यक्रमात निधन झाले. वयाच्या ३५ व्या वर्षी अचानक त्याने जगाचा निरोप घेतल्याने कलाकारामध्ये शोककळा पसरली आहे. आयरेस यांचा सॅलिनोपोलिसमधील सोलर हॉटेलमध्ये त्यांचा कार्यक्रम सुरू होता. तेथेच त्याचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, गायक आयरेस सासकी यांच्या सॅलिनोपोलिसमधील सोलर हॉटेलमध्ये परफार्मचा कार्यक्रम होता. या लग्नाच्या कार्यक्रमात तो स्टेजवर होता. याच दरम्यान त्यांचा एक भिजलेला चाहता त्यांना भेटायला स्टेजवर आला. आणि तो मिठी मारण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात स्टेजवर दोघांनाही बाजूने असणाऱ्या केबलमधून विजेचा झटका बसला.

या घटनेत आयरेस यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, हा भिजलेला चाहता स्टेजवर कसा आला? याचे कारण अध्याप समोर आलेले नाही. या घटनेचा पोलिस पुढील तपास करत आहेत. त्याच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर पसरताच चाहत्यांनी कॉमेन्टस करत श्रद्धांजली वाहिली आहे. याआधी आयरेसने शेवटची डिसेंबर २०२३ मध्ये सोशल मीडिया पोस्ट शेअर केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news