पुढारी ऑनलाईन डेस्क: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर गेल्या काही दिवसापूर्वी अन्नातून विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. आता जान्हवीची प्रकृत्ती ठिक असल्याने तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी तिच्या तब्येतीविषयी ही माहिती दिली आहे.
बोनी कपूर यांनी सांगितले की, ''काल शनिवारी सकाळी जान्हवीला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता तिची तब्येत पहिल्यापेक्षा खूपच चांगली आहे. काळजी करण्याचे काही काम नाही.'' सध्या जान्हवी तिची बहीण खुशी कपूर आणि प्रियकर शिखर पहारिया यांच्यासह तिच्या कुटुंबाच्या देखरेखीखाली आहे.
अभिनेत्री जान्हवी कपूरला गुरुवारी १८ जुलै रोजी अन्नातून विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल झाल्याने जान्हवीला तिचे शूटिंग आणि इतर कार्यक्रमांचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आलं आहे.
रिपोर्टनुसार, तिची एक जवळची मैत्रीणीने माहिती दिली की, “अन्नातून विषबाधा झाली आहे. बुधवारी जान्हवी घरी झोपून होती. तिला खूप अशक्तपणा होता आणि ती चिंतेत होती. तिने बुधवारी आणि उर्वरित आठवड्यासाठी तिच्या सर्व भेटी पुढे ढकलल्या. गुरुवारी तिची आणखी तब्येत बिघडली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला आणि तिला रुग्णालयात दाखल केले. ती आता बरी होत आहे. पण, तिला अशक्तपणा आहे. तिला शुक्रवारपर्यंत डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे.”