

Chand Mera Dil Ananya Panday dance trolled
अभिनेत्री अनन्या पांडेचा नवीन चित्रपट 'चांद मेरा दिल' सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असला, तरी त्यातील एका डान्स सीनमुळे अनन्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. २२ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील अनन्याच्या भरतनाट्यम डान्सची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्यावर नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे.
चित्रपटात अनन्या 'चांदनी' ही भूमिका साकारत आहे, जी इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी असण्यासोबतच एक भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनन्या डान्स करताना दिसत आहे, पण प्रेक्षकांना तिच्या मुद्रा आणि मुव्ह्ज अजिबात आवडलेल्या नाहीत. तिच्या या व्हायरल क्लिप्सवर अनेक युजर्सनी या डान्सला 'रोबोटिक' म्हटले आहे. ही भारतीय शास्त्रीय नृत्याची थट्टा असल्याचे अनेकांचे मत आहे. एक्स अकाऊंटवर एका युजरने लिहिले की, "भरतनाट्यमची घसरण २०० एडी मध्येच सुरू झाली होती आणि २०२६ मध्ये अनन्या पांडेने त्याचा अंत केला."
video-opinionated fellow
मीम्सचा महापूर
या डान्स सीनवरून सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे. काही युजर्सनी अनन्याच्या अभिनयावर आणि तिच्या 'नेपोटीझम' पार्श्वभूमीवरही टीका केली आहे. डान्समधील तांत्रिक चुका काढत एका अनुभवी नृत्यांगनेने याला "बेवकूफी" असे संबोधले आहे. मात्र, इतक्या टीकेनंतरही अनन्याच्या चाहत्यांनी तिची बाजू लावून धरली आहे. काही चाहत्यांच्या मते हा चित्रपट आणि त्यातील तो सीन कल्पक आहे आणि विनाकारण तिला लक्ष्य केले जात आहे.
चांद मेरा दिलचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
एकीकडे टीका होत असली तरी चित्रपट कमाईच्या बाबतीत मागे नाही. 'चांद मेरा दिल' ने पहिल्या दिवशी ३ कोटी रुपयांची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी हा आकडा ३.७५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. आतापर्यंत या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ८.८१ कोटी रुपये झाले आहे.