Manisha Koirala: चित्रपटात आक्षेपार्ह दृष्य, अभिनेत्री अनभिज्ञ; शेवटी मदतीसाठी घ्यावी लागली होती बाळासाहेब ठाकरेंकडे धाव

Manisha Koirala|अश्लील सीन जोडेले गेले; मनिषा कोईरालाला कळू देखील दिलं नाही...कोर्टात घ्यावी लागली होती धाव
Manisha Koirala
Manisha KoiralaInstagram
Published on
Updated on
Summary

अभिनेत्री मनिषा कोईरालाने एका मुलाखतीत जुन्या वादग्रस्त प्रसंगाची आठवण सांगितली. एका चित्रपटात तिच्या नकळत अश्लील सीन जोडण्यात आल्याचं समजल्यानंतर ती हादरली होती. या प्रकरणामुळे अभिनेत्रीला न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. तिच्या या खुलाशामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडमधील कलाकारांच्या अधिकारांवर चर्चा सुरू झाली आहे.

२००२ मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'एक छोटी सी लव्ह स्टोरी'ने २४ वर्षांपूर्वी धुमाकूळ घातला होता. रिलीज झालेला चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या सुपरहिट झाला होता. मुख्य भूमिकेत मनीषा कोईरालासोबत आदित्य सील होता. शिवाय रणवीर शौरीने देखील चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

Manisha Koirala
Drishyam 3 cast fee | 'दृश्यम ३'मध्ये 'या' कलाकारांनी घेतले सर्वाधिक मानधन, कमी मानधन घेणारे कलाकार कोणते?

बॉलिवूडमध्ये अनेकदा चित्रपट अधिक चर्चेत यावा किंवा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घ्यावं यासाठी निर्माते-दिग्दर्शक काही बोल्ड दृश्यांचा वापर करतात. मात्र काही वेळा कलाकारांच्या संमतीशिवायही चित्रपटात बदल केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशाच एका वादग्रस्त प्रकरणामुळे अभिनेत्री मनिषा कोईराला एकेकाळी प्रचंड चर्चेत आली होती.

2002 साली प्रदर्शित झालेला ‘एक छोटी सी लव्ह स्टोरी’ हा चित्रपट त्या काळात मोठ्या वादात सापडला होता. या चित्रपटात मनिषा कोईराला प्रमुख भूमिकेत झळकली होती, तर दिग्दर्शनाची जबाबदारी शशिलाल नायर यांनी सांभाळली होती. चित्रपटाची कथा एका प्रौढ महिलेभोवती फिरते. तिच्या शेजारी राहणारा १५ वर्षांचा एक अल्पवयीन मुलगा तिच्या प्रेमात पडतो.

मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच मोठा वाद उभा राहिला. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या कथेबाबत मनिषा कोईरालाला सुरुवातीला मर्यादित बोल्ड दृश्यं असतील असं सांगण्यात आलं होतं. पण नंतर चित्रपटाच्या फायनल रीलमध्ये काही बोल्ड सीन्स जोडण्यात आले. हा चित्रपट पाहिल्यानंतर मनिषाच्या लक्षात आलं की, ती फारच बोल्ड दृश्ये आहेत.

Manisha Koirala
Amruta Khanvilkar|'त्या दिग्दर्शकाने मला चक्क सेटवर ढकलून दिलं...' अमृताने शेअर केला धक्कादायक अनुभव

विशेष म्हणजे, काही दृश्यांसाठी मनिषाने स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर निर्मात्यांनी बॉडी डबलचा वापर करून काही सेमी-न्यूड आणि बोल्ड सीन शूट केल्याचा आरोप तिने केला. पण नंतर तिने कोर्टात दाव घेत सांगितले की, ही दृश्ये हाटवण्यात यावीत आणि चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात यांवं. पण हे प्रकरण त्या काळात बॉलिवूडमधील सर्वात चर्चित वादांपैकी एक ठरलं.

प्रकरण अधिक गंभीर होत असल्याचे दिसताच मनिषाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही भेट घेतली होती. त्यांनी अभिनेत्रीला मदतीचं आश्वासन दिल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. मात्र तोपर्यंत चित्रपटाच्या अनेक प्रती वितरित झाल्या होत्या आणि काही ठिकाणी चित्रपट प्रदर्शितही झाला होता.

दिग्दर्शक शशिलाल नायर यांनी कोर्टात आपली बाजू मांडताना सांगितले की, अभिनेत्रीला या दृश्यांबाबत कल्पना होती. अखेर कोर्टाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यास नकार दिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news