attack १ : जॉन अब्राहमचा ‘अटॅक १’ चा ट्रेलर रिलीज

attack १ : जॉन अब्राहमचा ‘अटॅक १’ चा ट्रेलर रिलीज
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांचा आगामी 'अटॅक १' (Attack 1) चित्रपट १ एप्रिल २०२१ रोजी चित्रपटगृहात दस्तक देत असल्याची माहिती समोर आली होती. याआधी चित्रपटातील जॉनचा फर्स्ट लूक आणि एक पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. तर सध्या जॉन अब्राहम याच्या 'अटॅक १' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे.

आगामी 'अटॅक १' चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस, रकुल प्रीत सिंह आणि प्रकाश राज याच्या मुख्य भूमिका असणार आहेत. नुकताच attack १ चित्रपटाचा एक मिनिट ३८ मिनिटांचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ट्रेलरमध्ये जॉन आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी जीव ओतून काम करताना दिसत आहे. जबरदस्त अॅक्शन आणि रोमान्सने भरलेल्या ट्रेलरमध्ये जॉनची धमाकेदार स्टाईल चाहत्यांना पाहायला मिळत आहे. याशिवाय जॅकलीन फर्नांडिस ट्रेलरमध्ये घाबरलेली आणि धावताना दाखवण्यात आलं आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीला पहिल्यांदा जॉन हल्ल्याच्या ठिकाणी असुरक्षित दिसत आहे, परंतु, दुसऱ्या क्षणी तो त्याच्या मोहिमेकडे वळतो, जिथे तो त्याचे अदम्य धैर्य दाखवतो. चित्रपटात जॉन शत्रूंशी दोन हात करताना दिसला. या ट्रेलरचा एक व्हिडिओ जॉन अब्राहमने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये जॉनने 'भारताचा पहिला सुपर सैनिक देशाला वाचवण्यासाठी आला आहे.' असे लिहिले आहे.

अटॅक हा अॅक्शन ओरिएंटेड आणि सुपर सोल्जर चित्रपट आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम हा एका रेंजर ऑफिसरच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची कथा हाय जॅकवर आधारित आहे. या चित्रपटाचा निर्मातादेखील जॉन आहे. जॉन नुकताच 'सत्यमेव जयते २' सिनेमात दिसला होता.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेंन्टस केल्या आहेत. हा चित्रपट १ एप्रिल २०२२ रोजी चाहत्याच्या भेटीस येत आहे. यामुळे चाहत्याची चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news