जळगाव : सेवानिवृत्त शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जळगाव : सेवानिवृत्त शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Published on
Updated on

जळगाव पुढारी वृत्तसेवा : भुसावळ शहरात 12 वर्षीय मुलीवर सेवानिवृत्त शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी जयंत रायन (75) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

रविवार (दि. 6) रोजी दुपारच्या सुमारास पीडित 12 वर्षीय मुलगी दुपारी दोन वाजता क्लासला गेली असता यावेळी कुणीही आले नसल्याची संधी साधून संशयित आरोपी तथा सेवानिवृत्त शिक्षक जयंत रायन (75, रा. भुसावळ) याने पीडित मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार पीडितेने घरी आल्यानंतर आईला सांगितला. त्यानंतर सोमवार (दि. 7) पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांची भेट घेवून घडलेला प्रकार सांगितला.

याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकास अटक करण्यात आली असून अधिक तपास सहा.निरीक्षक मंगेश गोंटला हे करीत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news