

हतनूर (प्रतिनिधी) – बैलगाडीला जोराची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अंधारात अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. पंढरीनाथ सखाराम वाघ (वय ५० रा. शिवराई, ता. कन्नड) असे अपघातात जखमी झालेल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शिवराई फाटयाकडून रविवारी सायंकाळी मंगेश शेलार बैलगाडी घेऊन शिवराई गावाकडे निघाले होते. शिवराई गावाकडून दुचाकीवरून (क्र. एमएच २० बीएम ३३८९) पंढरीनाथ सखाराम वाघ टोल नाक्यावर जात होते. दुचाकीची बैलगाडीची जोरात धडक बसली. या अपघातात (accident) दुचाकीस्वार पंढरीनाथ सखाराम वाघ (वय ५० रा. शिवराई, ता. कन्नड) यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच हतनूर पोलीस चौकीचे बीट जमादार सतीश खोसरे , बीट जमादार कैलास करवंदे, बीट जमादार संजय आटोळे, पोलीस मित्र संतोष ढोले यांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचलंत का ?
पाहा व्हिडिओ