.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉसमध्ये रोज नवं काहीतरी घडत आहे. धनंजय पवार अर्थातचं डीपी निक्की तंबोलीची मस्करी करताना दिसत आहे. तो म्हणताना दिसतो की, लिपस्टीकचे प्रकार मला बघायचे आहेत. सगळे लिपस्टीकचे प्रकार बाहेर काढ, असं तो निक्की तंबोलीला सांगतो. धनंजय म्हणतो की, सगळ्या महाराष्ट्राला कळालं पाहिजे की, कोणकोणत्या प्रकारच्या लिपस्टीक आहेत. लिपस्टीक काऊंटिंग केलं जाणार आहे. प्रेक्षकांनो, ब्युटी पार्लरच्या क्लासेसला ५१ हजार फी असते. इथं फुकट आहे ...फुकट! पहिला आठवडा भांडण, दुसरा आठवडा मेकअपमध्ये...वर्षाताई एकमेकांना तुम्ही मेकअप फेकून मारला तर हा आठवडा असाचं निघून जाईल. कारण एवढं सामान तुमच्याकडे आहे. शब्दांची साठवणूक करा तुम्ही वर्षाताई.''
यावेळी निक्की तंबोली आणि डीपी एकमेकांशी बोलत असतात. पण वर्षा उसगावकर हे शांतपणे पाहत बसलेल्या दिसतात. वर्षाताई यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत.
कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील बिग बॉस मराठी शोच्या घराबाहेर पडलेत. त्यांनी आपल्या मुलाखतीत घरातील अनुभव सांगितले. ते म्हणाले की, अनुभव शब्दांतही सांगता येत नाही. आनंद वाटला. पण मी पहिल्याचं आठवड्यात बाहेर पडेन, असे वाटले नव्हते. माझं घरातील वावर, काम व्यवस्थित होतं.
घरातील सदस्यांबद्दल बोलताना ते म्हणाले की, अभिजित सावंत, अंकिता, डीपी टॉप ३ मध्या जातील असे वाटते. तर निक्की ही सर्वात भांडखोर सदस्य वाटली. वर्षा उसगावकर आणि निक्की मध्ये झालेल्या तू तू मै मै वर पुरुषोत्तमदादा पाटील म्हणाले, वर्षाताई निक्कीला प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. पण, निक्की ते मनाला धरून बसली की मग वर्षाताईदेखील संतापतात. हा शो जिंकण्यासाठी कोण पात्र आहे, यावर ते म्हणाले, अभिजित सावंत यांच्यात ती क्षमता आहे. पुरुषोत्तम दादा यांचे बिग बॉसच्या घरात दोन चांगले मित्र झाले ते म्हणजे-पॅडी, डीपी. कल्लेदार सदस्याबद्दल सांगताना तो म्हणाला - सुरज चव्हाण एकदम भारी माणूस आहे.