

पुढारी ऑनलाईन डेस्क : कंगना रणौतचा मुंबईतील बांद्रा येथील पाली हिल परिसरात एक घर आहे. या प्रॉपर्टीमध्ये तिचे प्रोडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्सचे ऑफिस देखील आहे. सध्या ती राजकीय कारकिर्दीमुळे नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशमध्ये असते. आता अशी अफवा उडत आहे की, ती आपला मुंबईतील वांद्रे स्थित बंगला विकत आहे. रिपोर्ट्सनुसार, कंगनाच्या या घराची किंमत ४० कोटी रुपये आहे.
एका प्रॉडक्शन हाऊसचे कार्यालय विक्रीसाठी तयार असल्याचा दावा करणारा व्हिडिओ शेअर झाला आहे. व्हिडिओमध्ये वापरलेले फोटो हे कंगनाचेच ऑफिस असल्याचे म्हटले जात आहे. तर अनेकांनी हे कंगनाचे घर असल्याचे म्हटले आहे. भूखंडाचा आकार २८५ चौरस मीटर असल्याचे उघड झाले असून घरामध्ये ५०० चौरस फूट अतिरिक्त पार्किंगची जागा देखील आहे. ही इमारत दोन मजली असून त्याची किंमत ४० कोटी रुपये आहे.
कंगनाने या वृत्तांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. वास्तविक, कंगनाची ही तीच मालमत्ता आहे, जी बीएमसीच्या छाननीखाली आली होती. रिपोर्टनुसार, बीएमसीने बेकायदेशीर बांधकामाचा हवाला देत कंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयाचा काही भाग पाडला होता.
कंगनाच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचे झाले तर, ही अभिनेत्री लवकरच 'इमर्जन्सी' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती दिग्दर्शन आणि अभिनय दोन्ही करत आहे.