दमदार कलाकारांच्या अभिनयाने नटलेला "नवरा माझा नवसाचा 2", नवे पोस्टर लॉन्च

"नवरा माझा नवसाचा 2" चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च
Navra Maaza Navsaacha 2
नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट २० सप्टेंबरला रिलीज होणार आहेSachin Pilgaonkar Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : तब्बल १९ वर्षापूर्वी अल्पावधीतच हिट झालेल्या "नवरा माझा नवसाचा" या एव्हरग्रीन चित्रपटाच्या यशानंतर आता "नवरा माझा नवसाचा २" या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. हे जाहीर झाल्यापासूनच रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आलेल्या रिलीज डेटच्या टीजर व्हिडिओला तर अल्पावधीतच कमालीचा प्रतिसाद मिळाला. नुकतेच ह्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले आहे. (Navra Maaza Navsaacha 2)

नवरा माझा नवसाचा २ मध्ये कोण असतील कलाकार?

सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाची निर्मिती, कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले आहे. संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगावकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट चित्रपटाच्या पोस्टरवर पाहायला मिळत आहेत.

कधी रिलीज होणार नवरा माझा नवसाचा-२ चित्रपट

येत्या २० सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन होणार यात शंका नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news