Bigg Boss Marathi 6 double Elimination| काटा गँग-टोळी गँगमधून कोण होणार एलिमिनेट, बिग बॉसने घेतला हा shocking निर्णय, प्रभू शेळकेचं नाव समोर

Bigg Boss Marathi 6 double Elimination | काटा गँग-टोळी गँगमधून कोण होणार एलिमिनेट, बिग बॉसने घेतला हा shocking निर्णय, प्रभू शेळकेचं नाव समोर
Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 double Eliminationpudhari photo
Published on
Updated on
Summary

'बिग बॉस मराठी ६' चा खेळ आता अधिकच रंजक वळणावर आला आहे. या आठवड्यात बिग बॉसने 'डबल एलिमिनेशन'चा (Double Elimination) धक्कादायक निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेनुसार, 'काटा गँग' आणि 'टोळी गँग' मधील वादाच्या पार्श्वभूमीवर प्रभू शेळके याचे नाव घराबाहेर पडणाऱ्या सदस्यांमध्ये आघाडीवर आहे. प्रभू शेळकेचा प्रवास संपल्याच्या वृत्तामुळे त्याचे चाहते नाराज झाले असून, यामुळे घरातील समीकरणांमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.

बिग बॉसच्या नवा प्रोमो समोर आलाय. ज्यामध्ये घरच्या सदस्यांच्या मनात धाकधूक वाढल्याचे दिसते. या प्रोमोमध्ये रितेश म्हणतो- या आठवड्यात दोन एविक्शन होणार. दोन जणांपैकी एक जण काटा गँगमधला आणि एक जण टोळी गँगमधला. पहिलं एविक्शन काटा गँगमधलं आज होणार आहे. प्रेक्षकांनी काय निकाल दिला पाहुया.

Bigg Boss Marathi 6
Dhurandhar-2 Jahoor Mistri | 'धुरंधर २' चा 'जहूर मिस्त्री' पाहिलात? १४ सेकंदांच्या सीनसाठी अभिनेत्याने घटवलं १० किलो वजन; पाकिस्तानातही चर्चा!

कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस मराठी सीझन ६' मध्ये दररोज नवनवीन राडे आणि ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. सध्या घरातील वातावरण 'काटा गँग' आणि 'टोळी गँग' या दोन गटांमुळे चांगलेच तापलेले आहे. अशातच या आठवड्यात रितेश देशमुखने एक मोठा निर्णय घेतल्याचे समजते, ज्यामुळे घरातील सदस्यांची झोप उडाली आहे.

डबल एलिमिनेशनने खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्यात केवळ एक नाही तर दोन सदस्य घराबाहेर जाणार आहेत. बिग बॉसने घेतलेला हा 'डबल एलिमिनेशन'चा निर्णय यंदाच्या सीझनमधील सर्वात धक्कादायक निर्णयांपैकी एक मानला जात आहे. प्रेक्षकांच्या मतांच्या आधारे आणि घरातील कामगिरीच्या जोरावर हे एलिमिनेशन पार पडले आहे.

प्रभू शेळके घराबाहेर झाल्याच्या चर्चा जोरात!

Bigg Boss Marathi 6
Actress Rajshri Deshpande |"एकटीच रडले, खूप वेदना झाल्या..." कॅन्सरशी झुंज देणाऱ्या राजश्री देशपांडेने सांगितला तो थरारक अनुभव

प्रभू शेळकेचं घराबाहेर जाणार?

एलिमिनेशनच्या या प्रक्रियेत प्रभू शेळके याचे नाव समोर येत आहे. प्रभू शेळके सुरुवातीपासूनच आपल्या शांत पण संयमी खेळामुळे चर्चेत होता. मात्र, गेल्या काही दिवसांत 'काटा गँग' आणि 'टोळी गँग' मधील वादात त्याचा सहभाग आणि खेळातील सक्रियता कमी पडल्याचे बोलले जात आहे. प्रभू शेळकेचा गेम फारसा घरात चालला नसल्याचे म्हटले जात आहे.

काटा गँग आणि टोळी गँगमध्ये सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे. अशातच प्रभू सारख्या सदस्याचे जाणे म्हणजे घरातील गेम पालटणार आहे. प्रभू सोबत दुसरा कोणता सदस्य घराबाहेर पडणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news