Dhurandhar-2 Jahoor Mistri | 'धुरंधर २' चा 'जहूर मिस्त्री' पाहिलात? १४ सेकंदांच्या सीनसाठी अभिनेत्याने घटवलं १० किलो वजन; पाकिस्तानातही चर्चा!

Dhurandhar-2 Jahoor Mistri Vivek Sinha| एका सीनने बनवलं स्टार! 'धुरंधर २' मधील जहूर मिस्त्रीसाठी अभिनेत्याची मोठी कसरत; पाकिस्तानमधूनही आल्या 'अशा' कमेंट्स
vivek sinha
vivek sinha Dhurandhar-2 Jahoor Mistri pudhari photo
Published on
Updated on
Summary

'धुरंधर २' या चित्रपटातील 'जहूर मिस्त्री' ही व्यक्तिरेखा सध्या चांगलीच गाजत आहे. केवळ १४ सेकंदांच्या एका टीझर/सीनमुळे या भूमिकेची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी संबंधित अभिनेत्याने कठोर मेहनत घेत तब्बल १० किलो वजन कमी केले आहे. विशेष म्हणजे, या पात्राचा लूक पाहून सीमेपलीकडून म्हणजेच पाकिस्तानमधूनही अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

vivek sinha role play as Jahoor Mistri in Dhurandhar-2

सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये 'धुरंधर २' या चित्रपटाची मोठी लाट पाहायला मिळत आहे. चित्रपटातील संवाद आणि ॲक्शन तर चर्चेत आहेतच, पण एका अशा पात्राने सर्वांचे लक्ष वेधले आहे ज्याचा स्क्रीन टाईम खूप कमी असूनही त्याचा प्रभाव प्रचंड मोठा आहे. हे पात्र म्हणजे 'जहूर मिस्त्री'.

जुहूर मिस्त्रीच्या भूमिकेवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया

सोशल मीडयावर विवेक यांना खूप सारे संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. खूप साऱ्या फॅन्सनी त्यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. तर थेट पाकिस्तानातून कमेंट्स आल्या. एका मुलाखतीत विवेक सिन्हा हसत म्हणाले, 'माझं संपूर्ण आयुष्य बदललं. हे माझ्या अपेक्षेहून कितीतरी अधिक होतं. १४ सेकंगाच्या फुटेजने मला स्टार बनवलं. एका स्टार सारखा अनुभव आला. पण, काही लोकांचा संताप होता.' मला इन्स्टाग्रामवर हजारों कमेंट्स, मेसेज आले. त्यामद्ये अनेक जणांनी कमेंटमध्ये लिहिलं - 'सर, आय लव्ह यू फ्रॉम पाकिस्तान'.

एका ट्रोलरने विवेक यांना इन्स्टाग्रामवर मेसेज केला की, तू हिंदू असून काही पैशांसाठी असे डायलॉग्ज बोलत आहेस का? यावर विवेक सिन्हा यांनी त्या ट्रोलरला एक व्हॉईस नोट पाठवली आणि म्हटले- 'जर आम्ही एक चित्रपट बनवत आहोत, तर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी कोणती क्रुरता केलीय, हे सीन दाखवायचे असतील तर यासाठी आम्ही पाकिस्तानातून कलाकार आणायचे का? आम्हालाच अभिनय करून दाखवावं लागेल ना? या उत्तरानंतर ट्रोलर्सची बोलती बंद झाली.

vivek sinha
Bigg Boss Marathi - 6 | 'मला हे घर घाण नकोय'.. राखीनं एकेकाला सुनावलं; राकेश बापट, तन्वीला लागली तिखट मिरची

त्यांनी धुरंधर २ चा डायलॉग पोस्ट केला होता. यावर लोकांनी त्यांना वाईट बोलणे सुरु केले. यानंतर सोशल मीडियावर ट्रोलिंग पाहून विवेक यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की, मी दहशतवादी नाहीये.

विवेक सिन्हा यांना जुहूर मिस्त्रीची भूमिका कशी मिळाली?

विवेक म्हणाले, ''मुकेश छाब्रा यांच्या ऑफिसमधून फोन आला की ऑडिशन द्यावं लागेल. घरातून मोबाईलवरूनचं ऑडिशन व्हिडिओ पाठवला. त्यानंतर पुन्हा एकदा लूक टेस्ट झाला. माझे वाढलेले दाढी-केस होते. निर्माते म्हणाले, दाढी-केस कापावे लागतील. मी स्वीकारलं आणि जुहूर मिस्त्रीसाठी निवड झाली.''

vivek sinha
'Hushpitality' ट्रॅव्हल का होतंय लोकप्रिय? निसर्ग, शांतता आणि डिजिटल डिटॉक्स..'हुशपिटॅलिटी' ट्रेंडची जोरदार चर्चा

तब्बल १० किलो वजन केलं कमी

सेटवर खूप चांगलं वातावरण होतं. पण, मला सुटलेलं पोट कमी करायला सांगितले. मला आधीच सांगण्यात आलं होतं की, १० किलो वजन कमी करावं लागेल. मी सेटवर १० किलो वजन कमी करून गेलो, तेव्हा खूपच आत्मविश्वास होता. आणि निर्मात्यांकडूनही कौतुक झालं. जहूर मिस्त्रीच्या या भूमिकेमुळे 'धुरंधर २' च्या लोकप्रियतेत अजूनच भर पडली आहे.

कोण आहेत विवेक सिन्हा?

विवेक सिन्हा बिजनौरचे रहिवासी आहेत. ते दिल्लीमध्ये असायचे. आता अडीच वर्षे झाली मुंबईत आहेत. त्यांनी आमिर खानच्या पीके चित्रपटातही काम केलं आहे. एका बाबाची चोटी भूमिका त्यांनी या चित्रपटात साकारली होती. मनोज वाजपेयी यांच्या सिर्फ एक बंदा काफी है, धनजंय चित्रपटांतही काम केलं आहे. तांडव आणि दिल्ली क्राईम्स या सीरीजमध्ये ते झळकले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news