Actress Rajshri Deshpande |"एकटीच रडले, खूप वेदना झाल्या..." कॅन्सरशी झुंज देणाऱ्या राजश्री देशपांडेने सांगितला तो थरारक अनुभव

Actress Rajshri Deshpande-'सेक्रेड गेम्स' फेम अभिनेत्री राजश्री देशपांडे रुग्णालयात; ब्रेस्ट कॅन्सरचे निदान होताच अभिनेत्रीने सांगितला वेदनादायी अनुभव
Actress Rajshri Deshpande
Actress Rajshri Deshpandeinstagram
Published on
Updated on
Summary

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री राजश्री देशपांडे सध्या एका कठीण प्रसंगातून जात आहे. तिला ग्रेड १ ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे. सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर करत ती म्हणाली, नियमित तपासणीमुळे हा आजार सुरुवातीच्या काळातच लक्षात आला. सुरुवातीला याबद्दल सांगण्याचे धैर्य तिच्यात नव्हते, मात्र शस्त्रक्रियेनंतर तिने आपला अनुभव जगासमोर मांडला असून महिलांना आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.

Rajshri Deshpande Cancer News - 'सेक्रेड गेम्स', 'ट्रायल बाय फायर' आणि 'मँटो' यांसारख्या गाजलेल्या सीरीजमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री राजश्री देशपांडेने तिच्या आजाराबद्दल मोठा खुलासा केला आहे. ती सध्या एका गंभीर आजाराशी लढा देत असून तिने ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे सांगितले आहे. रुग्णालयातील आपला फोटो शेअर करत तिने या संपूर्ण प्रवासातील मानसिक आणि शारीरिक त्रासाबद्दल सांगितले आहे. (Actress Rajshri Deshpande)

जेव्हा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं...

राजश्री म्हणाली, जेव्हा मला पहिल्यांदा कॅन्सरबद्दल समजलं, तेव्हा मी रुग्णालयात एकटीच होते आणि पूर्णपणे खचून गेले होते. तिने इन्स्टावर पोस्ट मध्ये म्हटलंय- ''जेव्हा मला पहिल्यांदा माझ्या ब्रेस्ट कॅन्सरबद्दल कळलं, तेव्हाचा तो क्षण अजूनही मनात ताजा आहे-हॉस्पिटलमधल्या हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्ट सेंटरच्या बाहेर मी एकटीच उभी होते आणि अचानक रडून कोसळले. नाही, मी तेव्हा खंबीर राहू शकले नाही. माझ्यात अजिबात शक्ती उरली नव्हती.''

Actress Rajshri Deshpande
Peddi Ram Charan First Look | हातात गदा अन् पिळदार शरीरयष्टी! राम चरणचा 'पेड्डी'मधील धाकड पैलवान लूक आऊट; वाढदिवशी चाहत्यांना मोठी भेट!

“हे तुला कसं झालं? तू तर किती फिट आहेस…” आणि खरं सांगायचं तर माझ्याकडे त्याचं उत्तर नाही. त्या वेदना फक्त शरीरापुरत्या मर्यादित नव्हत्या; त्या मनाला आणि भावनांनाही खोलवर जखम करून गेल्या. अनेकदा मी खचले-कधी एकटी, तर कधी माझ्या मैत्रिणींसमोर. पण त्यांनी प्रत्येक टप्प्यावर माझा हात धरून मला साथ दिली. आणि हो, असेही अनेक दिवस आले जेव्हा मी पुन्हा उभी राहिले… हार मानली नाही.

काही दिवस असे असतात, जेव्हा वाटतं की माझ्यात जग जिंकण्याइतकी ताकद नाही. फक्त शांत बसावंसं वाटतं… माझ्या खिडकीतल्या बोगनव्हिलियावर बसलेल्या चिमण्यांसोबत सूर्योदय पाहत. चेहऱ्यावर एक हलकंसं हास्य घेऊन उठणं, हेच यश म्हणता येईल का? कदाचित हो. कारण आज मी ते केलं. स्वतःलाच एक हसू दिलं, स्वतःलाच एक मिठी मारली. आणि त्या सगळ्या लोकांची आठवण काढली, जे या प्रवासात माझ्यासोबत उभे आहेत. ज्यांनी फोन केले, मेसेज केले, आणि मला अपार प्रेम दिलं. मला माहीत आहे, उद्या पुन्हा अनेक लढाया समोर उभ्या राहतील. पण आजचा दिवस…फक्त प्रेमासाठी असू दे. कृपया.

Actress Rajshri Deshpande
Bade Sahab Dhurandhar 2 | ८ तासांचा मेकअ‍ॅप अन् रिकाम्या पोटी शूटिंग! डॅनिश इकबालने ‘बडे साब’साठी घेतलेली मेहनत पाहून थक्क व्हाल

राजश्री बरी होण्यासाठी सेलिब्रिटींसह फॅन्सची प्रार्थना

राजश्रीच्या या पोस्टवर सेलिब्रिटींसह फॅन्सनी कमेंट्स करत धीर दिला आहे. ती लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना केलीय. अभय देओल, कोंकणा सेन शर्मा यांनी ‘तुला खूप खूप प्रेम’ अशी कमेंट केली आहे. मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकरने ‘हग्स अँड हग्स’ अशी कमेंट केली आहे.तिलोत्तमा शोम, अश्विनी अय्यर तिवारी, सारंग साठ्ये, अभिनेत्री कुब्रा सैतने देखील राजश्रीला धीर दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news