Bigg Boss Marathi 4 : समृद्धी आणि अपूर्वामध्ये वाढतो आहे गैरसमज

bigg boss Marathi 4
bigg boss Marathi 4
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांचा एक जवळचा माणूस असतोच. जो आपल्या भावना समजतो, ज्याच्यासोबत आपण आपले सुख दुःख शेअर करतो. (Bigg Boss Marathi 4) अपूर्वा आणि समृद्धीचं नातं देखील असंच आहे. दोघी खुप चांगल्या मैत्रिणी आहेत. पण कुठेतरी आता दोघींमध्ये मतभेद होत असल्याचे दिसून येत आहे. अपूर्वाच्या वागण्याने समृद्धी दुखावली आहे. नक्की काय झालं आणि तिला असं वाटतं आहे याविषयी ती अपूर्वाशी चर्चा करताना दिसणार आहे. (Bigg Boss Marathi 4)

समृद्धीचे म्हणणे आहे, मला तुझी गरज वाटते आहे जेव्हा तू मैत्रीण म्हणून बघतेस ना की हि ठीक नाहीये एक percent पण तुला… त्यावर अपूर्वाचे म्हणणे आहे, तुझ्यासोबत यशश्री ऑलरेडी होती… समृद्धीचे म्हणणे आहे, नॉमिनेशनच जेव्हा झालं मी तुला बोलून नाही दाखवले, माझ्या मनात सुरु होतं सोड ते सोड ते… तुला गरज नाहीये कोणाची, तू आहेस खंबीर.

समृद्धी म्हणाली, तुझी गल्लत होते आहे. आणि ती का होते आहे हा राग अक्षयसाठी आहे जो तू माझ्यावर काढते आहेस. समृद्धी म्हणाली, मला फक्त इतकंच विचारायचे आहे तुला हे खरंच पटतं असेल ना मी माघार घेते आणि बोलते अपू i am sorry मी विचार चुकीचा केला असेल.

त्यावर अपूर्वा म्हणाली, तू यशश्रीच्या मिठीत पडली होतीस जे मी बघितलं. समृद्धी म्हणाली, मी जशी रडत होते ना… मला हे सांगायची पण इच्छा नहिये कारण आतापर्यंत एकदाही समजावलं नाही गेलं तुझ्याकडून its ok. तू सोडून जगभराला कळालं का मी रडत होते, मी किती अपसेट होते. पण तुला नाही कळलं.

आता अपूर्वा आणि समृद्धीमध्ये सगळं ALL Is WELL होईल का ? हे आज कळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news