इशान खट्टर : मीरा वहिनी खूपच प्रेमळ आहे | पुढारी

इशान खट्टर : मीरा वहिनी खूपच प्रेमळ आहे

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूड अभिनेता इशान खट्टर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. इशानचा ‘फोन भूत’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ज्यात त्याच्याबरोबर कॅटरिना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे; पण या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी इशानने त्याच्या कुंटुबीयांबद्दल विशेषतः त्याची वहिनी मीरा राजपूतबाबत मोठा खुलासा केला आहे.

इशान म्हणाला की, त्याची वहिनी म्हणजेच शाहिद कपूरची पत्नी मीरा घरातील सर्वाधिक तक्रार करणारी व्यक्ती आहे; पण ती माझ्यासोबत खूपच प्रेमळ वागते. तीनेहमीच, तू शूज येथेफेक लेस, तूतेके लेनाही आहेस, अशा तक्रारीकरत असते; पण तिचा हाच अंदाज मला खूप आवडतो. कोणत्याही सरप्राईज पार्टीज प्लॅन करण्यात मीरा खूप बेस्ट आहे. तिच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. त्यामुळे घरी असताना मी तिच्यासोबत बराच वेळ व्यतीत करतो. तिच्याकडे आयुर्वेद, खाण-पाण, संस्कृती आणि संस्कारांचे ज्ञान आहे.

Back to top button