Jacqueline Fernandez
Jacqueline Fernandez

Jacqueline Fernandez : जॅकलीनच्या जामिनावर आज सुनावणी, पटियाला हाऊस कोर्टात दाखल

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.(Jacqueline Fernandez) तत्पुर्वी, ती दिल्लीतील पटियाला कोर्टात दाखल झाली आहे. महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) शी संबंधित २०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या अडचणी कमी होईनात! आज सकाळी जॅकलीन दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात पोहोचली. कोर्टात जॅकलीनच्या जामीन याचिकेवर सुनावणी होईल. अभिनेत्री जॅकलीनकडून कोर्टात जामीन याचिका दाखल करण्यात आलीय. (Jacqueline Fernandez)

जॅकलीनची २२ ऑक्टोबर रोजी पटियाला उच्च न्यायालयात दाखल झाली होती. तेथे कोर्टाने तिला दिलासा देत अंतरिम जामीन १० नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती. ईडीने सातत्याने जॅकलीनला जामीन देण्यासाठी विरोध केला आहे.

जॅकलीनने अर्जाचा केला विरोध

ईडीने अभिनेत्री जॅकलीनच्या रेग्यूलर जामीन याचिकेचा विरोध केला आहे. ईडीचं म्हणणं आहे की, जॅकलीनने कधीही कोणत्याही तपासात सहकार्य केलेलं नाही. पुरावे समोर आल्यानंतरही काही सांगितलेलं नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news