.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. नॉमिनेशन टास्क नेमका कसा असेल? यात कोण सेफ आणि कोण नॉमिनेट होणार याकडे 'बिग बॉस' प्रेमींचं लक्ष लागलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात नायिका वर्सेस खलनायिका म्हणजेच योगिता चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर यांच्यात नॉमिनेशनवरुन पहिली वादाची ठिणगी पडली आहे.
पहिल्या टास्कदरम्यान 'बिग बॉस'ने ज्यांच्याकडे स्वत:ची स्टॅटर्जी नाही...दुसऱ्यांच्या आधारे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात अशा सदस्यांना नॉमिनेट करण्यास सांगितले आहे. दरम्यान योगिता आणि जान्हवी यांच्यात नॉमिनेशनवरुन मोठा वाद रंगलेला पाहायला मिळेल.
नॉमिनेशनवरुन जान्हवी म्हणते,"योगिताने मुर्खासारखं कारण न देता नॉमिनेट केलं आहे". दरम्यान योगिता म्हणते,"जान्हवी मी तुझ्यासारखं मुर्खासारखा हा शब्द वापरलेला नाही. तू तोंडावर वेगळी आहेस आणि मागे वेगळी वागतेस". यावर जान्हवी म्हणते,"पण मला योग्य कारण तर दे". त्यावर योगिता म्हणते,"बिग बॉस'ने सांगितल्यानुसारच मी नॉमिनेट केलं आहे".